मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आज त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज अभिनेत्याने ४९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. नेहमी हृतिक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. 
सध्या तो एका नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे.  त्याच्याहून 17 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोघंही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिक रोशन (Hrithik Roshan Saba Azad) आणि सबा आझाद नेहमी एकमेकांसोबत स्पॉट होत असतात. या दोघांच्या लिंकअपच्या चर्चाही गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. अनेकदा दोघं त्यांच्या सोशल मीडियावर एकमेकांविषयी पोस्टही शेअर करत असतात. त्यामुळेच सबा आणि हृतिक चर्चेत असतात. काही वर्षांपुर्वी हृतिकने पत्नी सुजैन खान (Sussanne Khan)ला घटस्फोट दिला. यानंतर तो आपल्यापेक्षा १६ वर्ष लहान अभिनेत्री सबा आजादला डेट करत आहे. नेहमी चर्चेत असणारी ही जोडी आज मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. 


सबा आझाद आणि हृतिकला अनेकदा बऱ्याच इव्हेंट आणि पार्ट्यांमध्ये स्पॉट केलं गेलं आहे. अनेकदा ही जोडी एकत्र फोटोही शेअर करतात. एवढंच नव्हेतर हृतिक आणि सबा एकत्र बऱ्याचदा वेकेशनलाही जाताना दिसतात. आता या जोडीबद्दल एक आनंदाची बातमी समोर येतेय. आणि ही बातमी आहे अभिनेत्याच्या लग्नाची. दोघांचं हे नातं आता ही जोडी पुढे नेऊ ईच्छितात.


यावर्षी अडकणार लग्नबंधनात?
काही मीडिया रिपोर्टनुसार, र हृतिक रोशन दुसऱ्यांदा लग्न करू शकतो. हृतिक आणि सबा 2023 मध्येच सात फेऱ्या घेण्याचा विचार करत आहेत!  बर्‍याच बातम्यांमध्ये असं म्हटलं जात आहे की, हृतिकला सबाला 'गर्लफ्रेंड' ते 'बायको' बनवायचं आहे आणि तो यावर्षीच तसं करू शकतो. हृतिकचं कुटुंब आणि त्याची मुलंही या निर्णयाने खूप खूश आहेत आणि त्यांना वाटतं की सबा हृतिकसाठी योग्य पर्याय आहे. मात्र या जोडीकडून अद्यापतरी कोणीही लग्नाबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळं चाहत्यांना सध्या या चर्चांवरच समाधान मानावं लागणार आहे.


हे जोडपं लग्नाचा विचार नक्कीच करत असेल पण त्यांना याबाबत कोणतीच घाई नाही. कदाचित हे जोडप वर्षाच्या अखेरीस लग्न करण्याचा निर्णय घेईल. की त्यांची सगळी कामं संपली आहेत आणि ते एकमेकांसोबत वेळ घालवू शकतात आणि लांब सुट्टीवर जाऊ शकतात. हृतिक आणि सबाला भव्यदिव्य लग्न नको आहे त्यांना एक छोटासा सोहळा हवा आहे ज्यामध्ये फक्त त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि जवळची मित्र सहभागी असतील.