मी देखील सलमानसोबत शिकारीवर जायचे; दावा करत सोमी अली म्हणाली, `बिष्णोई समाजाला हे...`
Somy Ali on Salman Khan : सोमी अलीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमानसोबत ती शिकारीवर जायची याविषयी सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
Somy Ali on Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीनं धक्कादायक खुलासा केला आहे. सोमीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की सलमानसोबत आउटडोर शूटिंग दरम्यान, शिकारीवर जायची. इतकंच नाही तर सोमीनं हे देखील सांगितलं की सलमानला माहित नव्हतं की बिष्णोई समाजात काळवीटची पूजा करतात. सोमी अलीनं केलेल्या या खुलाशानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
सोमीनं ही मुलाखत 'इंडिया टुडे'ला दिली होती. या मुलाखतीत ती म्हणाली, "या गोष्टीसाठी माफी का मागेल, ज्या गोष्टीविषयी त्याला काही माहितच नव्हतं? त्यात काही तथ्य नाही. लोक म्हणतात की तो खूप गर्विष्ठ आहे आणि त्याच्याविषयी आता सगळेच हे बोलतात. आज माझा त्याच्याशी किंवा त्याच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की कोणत्याही बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या सेलिब्रिटीची हत्या झाली, तर हिंसा करणं हे कोणत्याही प्रकारचं उत्तर किंवा सुढ घेण्याची योग्य पद्धत नाही."
सोमीनं पुढे सांगितलं की "सलमान खूप चांगली व्यक्ती आहे. त्याचं एक एनजीओ देखील आहे. त्यांना माहित नव्हतं की बिष्णोई समाज त्या प्राण्याची पूजा करतात. तुम्हाला वाटतं का की सलमान हा एकमेव व्यक्ती आहे जो या परिसरात जाऊन शिकार करतो? तो फक्त सलमान खान आहे त्यामुळे ते लोक त्या विषयी बोलतायत आणि त्याच्या मागे लागले आहेत."
हेही वाचा : करण जोहरनं धर्मा प्रोडक्शन विकलं? 1000 कोटींमध्ये झाला व्यवहार; कोणी मोजली इतकी गडगंज रक्कम?
पुढे सलमाननं तिला याविषयी कधी सांगितलं होतं का आणि स्वत: निर्दोष असल्याचं सांगितलं होतं का? असं विचारण्यात आलं असता सोमी म्हणाली, "बिष्णोई समाजाला हे कळायला हवं की सलमानला माहित नव्हतं. त्यानं मला सांगितलं होतं की त्याला काही माहित नाही. हा मुर्खपणा आहे. मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगू शकते की सलमानला माहित नव्हतं की बिष्णोई समाज काळवीटची पूजा करतात. मी त्याच्यासोबत आउटडोर शूटिंग करताना अनेकदा त्याच्यासोबत शिकारवर गेली होती. खरंतर, 1998 च्या शूटिंग दरम्यान, तो मला शिकारीसाठीसोबत घेऊन गेला नव्हता. त्यानं सांगितलं होतं की 'तू मुद्दामून मोठ्यानं आवाज करत शिकार करशील आणि प्राणी पळू लागतील.' मला खेळ म्हणून शिकार करणं आवडत नाही. एकदा मी गेले नव्हते. तर त्यांना प्राण्याला पकडलं होतं."