Jab We Met : बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक इम्तियाज अली गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या 'चमकीला' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यावेळी इम्तियाजनं अली यांना त्यांच्या 'जब वी मेट' या चित्रपटाच्या सीक्वेलवर वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर जर त्यांनी हा सिक्वल बनवला तर कोणते कलाकार गीत आणि आदित्यची भूमिका साकारतील हे सांगितलं. चला तर जाणून घेऊया या सगळ्याविषयी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्तियाज अली यांनी इंडियाटुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की "मी 'जब वी मेट' चा सीक्वल बनवणार नाही. कारण मला वाटतं की तो चित्रपट तसाच पूर्ण होता. मी कधीच या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याविषयी विचार केला नव्हता." 



त्याशिवाय इम्तियाज अली यांनी सांगितलं की 2023 मध्ये जेव्हा 'जब वी मेट' थिएटर्समध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. तेव्हा प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. तेव्हा त्यांना या चित्रपटाच्या कल्ट स्टेटसचा अंदाज मिळाला. इम्तियाज यांनी सांगितलं की ते त्यावेळी पंजाबमध्ये शूटिंग करत होते आणि तेव्हा त्यांनी पाहिलं की थिएटर्समध्ये लोक कशा प्रकारे डान्स करत आहेत.  


कोणते कलाकार साकारणार गीत आणि आदित्य?


इम्तियाज अली यांनी सांगितलं की जर सीक्वल बनवला तर ते गीत आणि आदित्यच्या भूमिकेत कोणत्या कलाकारांना कास्ट करतील. तेव्हा त्यांनी सांगितलं की दिलजीत दोसांझला आदित्यची भूमिका देणार तर परिणीति चोप्राला गीतची भूमिका. इम्तियाज सध्या या दोन्ही कलाकारांसोबत 'चमकीला' या चित्रपटात काम करत आहेत. हा चित्रपचट पंजाबचे दिग्गज गायक अमर सिंह चमकीला आणि त्याची पत्नीच्या आयुष्यावर आधारीत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर तुम्ही हा चित्रपट 12 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 


हेही वाचा : भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! IPL मध्ये ऑरीची कमेन्ट्री करताना पाहून नेटकरी संतप्त


'जब वी मेट' विषयी बोलायचे झाले तर शाहिद कपूर आणि करीना कपूर यांनी या चित्रपटात भूमिका साकारली होती तर 2007 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याशिवाय 2007 मधील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये हा एक चित्रपट होता. लक्षवेधी गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, करीना आणि शाहिदचा ब्रेकअप झाला होता.