भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! IPL मध्ये ऑरीची कॉमेन्ट्री पाहून नेटकरी संतप्त

IPL 2024 Orry : आयपीएल 2024 मध्ये ऑरीला कॉमेन्ट्री करताना पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप..

दिक्षा पाटील | Updated: Mar 23, 2024, 04:02 PM IST
भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! IPL मध्ये ऑरीची कॉमेन्ट्री पाहून नेटकरी संतप्त title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2024 Orry : आयपीएल 2024 ची सुरुवात झाली आहे. सगळ्या टीम्स या मैदानावर येत असून त्यांच्या सामन्यांना सुरुवात काल पासून झाली आहे. तर काल या स्पर्धेची सुरुवात झाली असून त्याच्या ओपनिंगला अनेक बॉलिवूड कलाकारांनी परफॉर्म केलं. त्यात 'बडे मियां छोटे मियां' साठी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ देखील पोहोचले. त्यांनी तिथे परफॉर्म देखील केलं. त्याशिवाय अनेक गायकांना लाइव्ह परफॉर्म केलं. त्यात दिग्ग्ज गायक आणि म्यूजिक कम्पोजर एआर रहमान, सोनू निगम, मोहित चौहान हे गायक होते. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे ऑरीनं वेधले. ऑरीला तिथे पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. इतकंच नाही तर सगळ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी यंदा IPL 2024 चं प्रक्षेपण हे दोन ठिकाणी होत आहे. एकीकडे नवजोत सिंह सिद्धू यांनी एक कमेंटेटर म्हणून पुन्हा एन्ट्री केली आहे. तर त्यांची कॉमेन्ट्री ही स्टार स्पोर्ट्सवर दिसते. तर दुसरीकडे क्रिकेटचे दिग्गज हे एकत्र येऊन जियो सिनेमावर 12 भाषांमध्ये प्रेक्षकांना माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, यावेळी सगळ्या दिग्गज क्रिकेटर्ससोबत ऑरीला पाहून सगळ्या प्रेक्षकांनी त्यांच्या कपाळाला हात लावला. 

जियो सिनेमावर कमेंटेटर्स पॅनलला ऑरीनं जॉइन केलं होतं. तो काही काळासाठी त्या कॉमेन्ट्री बॉक्समध्ये आपल्याला दिसला. यावेळी कमेंटेटर्स बॉक्समध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग देखील होते. त्यावेळी ऑरीनं या दोघांना त्याचा हॅलिकॉप्टर शॉट दाखवला. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग त्याचा फेवरेट शॉट दाखवण्यास सांगितलं. तर वीरेंद्र सेहवाग म्हणाला, जर त्यानं त्याचा फेवरेट शॉट मारला तर याला बाहेरच पाठवेन. 

हेही वाचा : ...अन् सुष्मिता सेननं उर्वशीकडून काढून घेतला मिस यूनिव्हर्सचा क्राउन! विजेती ठरुनही दाखवला बाहेरचा रस्ता?

दरम्यान, ऑरीला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी ऑरीचा फोटो शेअर करत म्हणाला, "हा ऑरी कोणता क्रिकेट एक्सपर्ट आहे? हा माणूस वर्ल्ड कपच्या हीरोंसोबत स्टेज शेअर करतोय." दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं की खरंतर, "यानं त्याच्या सेलिब्रिटी मित्रांसोबत सेल्फी काढायला हवे." तिसरा नेटकरी म्हणाला, "कोणत्या छपरी लोकांना जियो सिनेमा बोलावतं." आणखी एक नेटकरी म्हणाला, "भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस." दुसरा नेटकरी चिडून म्हणाला, "या ऐवजी मला बोलावलं असतं.