नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले. 'प्रो पाकिस्तान' टर्किश हॅकर ग्रुपकडून त्यांचं अकाऊंट हॅक करण्यात आले. त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा प्रोफाईल लावण्यात आला. त्यानंतर गायक अदनान सामीचे ट्विटर अकाऊंटही हॅक करण्यात आले. पण भारताकडून याचा पुरेपुर बदला घेण्यात आला आहे. याचा बदला म्हणून पाकिस्तानच्या 5 वेबसाईट हॅक करण्यात आल्या. त्यावर अमिताभ बच्चन यांचा हातात तिरंगा घेतल्याचा फोटो दिसत आहे. तसेच इंडीयन सायबर सोल्जर आणि हिंदुस्थान झिंदाबाद असा संदेशही पाकिस्तानच्या हॅकर्सना देण्यात आला आहे. भारताने हॅक केलेल्या पाकिस्तानच्या साईटवर सुरुवातीला वंदे मातरम ही ऐकायला मिळत आहे.


हॅकर्सचा प्रताप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता गायक अदनान सामी यांचे अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. अमिताभ यांच्या अकाऊंट प्रमाणेच सामीच्या अकाऊंटवरही पाकिस्तान पीएम इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला आहे. तुर्कीतील पाकिस्तानी समर्थक ग्रुप अयालडिज टीमने अदनानचे अकाऊंट हॅक केल्याची माहीती समोर येत आहे. अदनानच्या खऱ्या ट्विटर अकाऊंटवर माझे अकाऊंट हॅक करण्यात आल्याचा मेसेज लिहिला आहे. तर दुसऱ्या अकाऊंटवरून देखील अदनाननचे नाव आणि काही पोस्ट ट्वीट करण्यात आल्या आहेत.



बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केल्यानंतर त्यांचा प्रोफाईल फोटो बदलून त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं छायाचित्र लावण्यात आलं. शिवाय प्रोफाईल ज्या व्यक्तीचं आहे, त्याविषयी थोडी माहिती देण्यात येण्याच्या भागात 'लव्ह पाकिस्तान', असंही लिहिण्यात आलं. ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यावरुन काही ट्विट करण्यात आले. ज्यामध्ये फुटबॉल खेळाचाही उल्लेख करण्यात आला आहे. हा एक मोठा सायबर हल्ला असल्याचं सांगत य़ाच ट्विटच्या माध्यमातून आईसलँडच्या फुटबॉल संघाकडून तुर्कस्थानच्या खेळाडूंना दिलेल्या वागणुकीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.