Ira Khan and Nupur Shikhare : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खाननं गेल्या वर्षी 10 जानेवारी 2023 मध्ये उदयपुरमध्ये शाही थाटामाटात लग्न केलं. त्याच्या आधी या दोघांनी 3 जानेवारी रोजी मुंबईच्या ताज लॅंड्स एन्डमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाच्या वेळी लग्नाच्या ठिकाणापर्यंत नुपुर हा 8 किलो मीटर पेक्षा जास्त धावत आला होता. त्यामुळे त्या दोघांचं लग्न हे खूप चर्चेत होतं. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष झालं आहे. या निमित्तानं नुपुरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यानं इराचा सत्कार केला आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुपुर शिखरेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो इराला शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना दिसत आहे. त्यानंतर तो इराचा हात मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि त्यानंतर नुपुर ज्या पद्धतीनं सगळं सांभाळतो ते पाहून अनेकांन हसू अनावर झालं आहे. हा व्हिडीओ शेअर करत नुपुरनं कॅप्शन दिलं आहे की 'माझ्या सोबत लग्न करायच धाडस दाखवण्यासाठी आणि एक अख्ख वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्या बद्दल, मी माझी मिसेस, सौ. इरा खान हिचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार करतोय.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा : गाण्यासाठीच 75 कोटींचा खर्च; मग राम चरणचा 'Game Changer' हा चित्रपट कसा असेल? पाहा ट्रेलर


नुपुरच्या या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'आता एक ऊखाणा घ्या बर.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'नेहमीच असं काही तरी वेगळं काय करतो.' तिसरा नेटकरी उखाणा शेअर करत म्हणाला, 'नुपुरच्या संसाराला इराची साथ, एक नाही, दोन नाही, तीन नाही... सात जन्म राहूदे असाच हातात हात.' आणखी एक नेटकी म्हणाला, 'लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची सगळ्यात कॅज्युअल पद्धत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुम्ही दोघं एकत्र खूप सुंदर दिसतात. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.'