Ram Charan Game Changer Movie Trailer : दाक्षिणात्य अभिनेता राम चरणचे लाखो चाहते आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे चाहते त्याचा आगामी चित्रपट 'गेम चेंजर' ची प्रतीक्षा करत होते. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी काल म्हणजे गुरुवारी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. त्यात राम चरण हा जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सगळीकडे याचीच चर्चा रंगली आहे.
चित्रपटाच्या ट्रेलर विषयी बोलायचं झालं तर हा 2 मिनिटं 37 सेकंदाचा ट्रेलर आहे. राम चरण या चित्रपटात डबल रोल साकारत आहे. या चित्रपटात तो एकीकडे नेत्याची भूमिका साकारतोय तर दुसरीकडे आयएएस ऑफिसरची भूमिका साकारतोय. राम चरण या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन करताना दिसतोय. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. एक नेटकरी म्हणाला, एक आहे रामायणचा राम आणि दुसरा आहे दाक्षिणेतील राम. दुसरा नेटकरी म्हणाला, हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार. तिसरा नेटकरी म्हणाला, अखेर हेलिकॉप्टर असलेला सीन जबरदस्त आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, दोन भाऊ दोघं भारी.
ट्रेलरमध्ये कियारा आडवाणीच्या भूमिका देखील काही प्रमाणात स्पष्ट होते. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटानं चार गाण्यांना शूट करण्यासाठी 75 कोटीं खर्च करण्यात आले. तर या संपूर्ण चित्रपटासाठी तब्बल 450 कोटी लागल्याचे म्हटले जाते. या चित्रपटात राम चरण आणि कियारा आडवाणी व्यतिरिक्त अंजलि, समुथिरकानी, एसजे सूर्या, श्रीकांत, प्रकाश राज आणि सुनील देील आहे. राम चरणच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबाद, न्यूझीलॅंड, विशाखापटनम, मुंबई आणि चंडीगढमध्ये आहे.
A 75 Crore Music Budget That Redefines Grandeur!
A @MusicThaman Musical #GameChanger #GameChangerOnJAN10
Global Star @AlwaysRamCharan @shankarshanmugh @advani_kiara @DOP_Tirru @SVC_official @ZeeStudios_ @AAFilmsIndia @GameChangerOffl pic.twitter.com/ZWlqORBm3r
— Saregama South (@saregamasouth) January 2, 2025
दरम्यान, राम चरण आता जवळपास 3 वर्षांनंतर त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा अखेरचा चित्रपट हा RRR आहे. 2022 मध्ये त्याचा हा चित्रपट आला होता त्याशिवाय त्याच वर्षी 'अचार्य' या चित्रपटात देखील तो दिसला होता. या चित्रपटात त्याचे वडील चिरंजीवी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.
हेही वाचा : 'त्या टवाळखोरचच नाव मिळालं..'; तैमूरवरून कुमार विश्वास यांनी सैफ- करीनाला सुनावले खडे बोल
एस. शंकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे आणि दिल राजू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुरुवातीला डिसेंबर 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख ही पुढे ढकलण्यात आली. आता राम चरणचा हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.