मुंबई : यंदाचं वर्ष फक्त सामान्य जनतेसाठीच नाही सेलिब्रिटींसाठी देखील धक्कादायक ठरलं. २०२०मध्ये कोरोना व्हायरसमुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले. मात्र अन्य आजारांमुळे देखील दिग्गज व्यक्तींनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता इरफान खान. २९ एप्रिल २०२० मध्ये इरफान खानचं निधन झालं. परंतु त्याचा मुलगा बाबिल कायम त्याच्या वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत असतो. बाबिलने आता वडिलांच्या कब्रच्या अवती-भोवती गुलाबाची फुले पसरवली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत भावून कॅप्शन लिहिले आहे. 'जेव्हा एक लहान मुलं जन्माला येतो, तेव्हा तो अत्यंत नाजूक असतो. मात्र जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो कठोर आणि असंवेदनशील असतो. जेव्हा एखादे झाड वाढत जाते तेव्हा ते मऊ आणि लवचिक असते, परंतु जेव्हा ते झाड कालांतराने सुकतं तेव्हा ते मरून जातं.' असं त्याने म्हटलं आहे



शिवाय, कठोरता आणि सामर्थ्य हे मृत्यूचे साथीदार आहेत. तर अनुकूलता आणि अशक्तपणा ही अस्तित्वातील ताजेपणाची अभिव्यक्ती असल्याच्या भानवा देखील त्याने या ठिकाणी व्यक्त केल्या. जो कठोर झाला तो कधीच जिंकू शकला नाही असं  देखील तो म्हणाला. 


दरम्यान,  इरफान खानला २०१८ मध्ये हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर, कर्करोग असल्याचे निदान झाले होते. मध्यंतरीच्या काळात इरफान खानने परदेशात जाऊन उपचार घेतले होते. त्यानंतर इरफान खान मुंबईत परतला होता. मात्र, २८ एप्रिलला प्रकृती खालावल्यामुळे इरफान खानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इरफान खानवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र, इरफानचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. अखेर २९ एप्रिल रोजी इरफान खानने अखेरचा श्वास घेतला.