मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तो मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाला होता.  तो एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला होता. मात्र, चेहऱ्यावर मास्क लावल्याने तरुणीची ओळख पटत नव्हती. हा व्हिडीओ व्हायरल होताच हृतिक त्या मुलीला डेट करत असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. मात्र आता त्या मुलीची ओळखही पटली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभिनेत्रीला डेट करतोय ऋतिक? 
एका रिपोर्टनुसार, हृतिक रोशनसोबत दिसलेल्या मुलीचं नाव सबा आझाद आहे. संगीतकार असण्यासोबतच ती एक उत्तम अभिनेत्री देखील आहे. शुक्रवारी रात्री हृतिक रोशन सबासोबत डिनरला गेला आणि जेव्हा तो रेस्टॉरंटमधून बाहेर पडत होता. तेव्हा त्याला पापाराझींनी घेरलं. मात्र, हृतिक आणि सबा एकमेकांना डेट करत आहेत. की नाही याबद्दल काहीही माहिती समोर अद्याप तरी आली नाही.


व्हायरल होतोय व्हिडिओ
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हृतिक रोशन सबासोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडत आहे. यादरम्यान त्याने सबाचा हात धरलेला दिसत आहे. फोटो क्लिक करण्यासाठी तो पापाराझींसमोर पोझ देत नाही आणि थेट त्याच्या कारकडे जातो. यानंतर हृतिक रोशन सबाला कारमध्ये बसवतो आणि नंतर त्याच कारमधून तोही निघून जातो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कोण आहे सबा आजाद?
सबा संगीतकार असण्यासोबतच ती अभिनेत्री देखील आहे. अलीकडेच ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'फील लाइक इश्क'मध्ये दिसली होती. आता ती 'रॉकेट बॉईज' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. काही वर्षांपूर्वी हृतिक रोशनने पत्नी सुझैन खानपासून घटस्फोट घेतला होता. मात्र, घटस्फोटानंतरही दोघं मिळून मुलांचा सांभाळ करतात. हृतिक रोशन आणि सुझैन अनेकदा मुलांसोबत स्पॉट केलं जातं.