मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य इंडस्ट्रीला दिलं. अनेक चढ-उतार असूनही, भारतरत्न लता मंगेशकर यांनी असा टप्पा गाठला की ज्यापर्यंत पोहोचण्याचं स्वप्नही त्यांनी पाहिलं नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लता दीदींनी आपल्या आवाजाने वर्षानुवर्षे इंडस्ट्रीवर राज्य केलं, स्वत:च्या आवाजाच्या जोरावर लता मंगेशकर यांनी देशातच नव्हे तर जगभरात आपला ठसा उमटवला. तेव्हापासून आजतागायत, लता मंगेशकर यांच्या आवाजाचं वेड चाहत्यांमध्ये पहायला मिळतं. लता मंगेशकर या लाखो-करोडो लोकांच्या प्रेरणास्थान आहेत. पण गमतीची गोष्ट म्हणजे एवढी कीर्ती असूनही लतादीदींनी पुढच्या आयुष्यात लता मंगेशकर व्हावं असं वाटत नव्हतं.


एका मुलाखतीदरम्यान खुद्द लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की, मला पुढील आयुष्यात लता मंगेशकर बनायचं नाही. लता दीदींच्या निधनानंतर त्यांच्या मुलाखतीची ही क्लिप सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दीदी म्हणत आहेत की, मला आधी कोणीतरी विचारलं होतं. त्यामुळे आताही माझं तेच उत्तर आहे की, मी केलं तर चांगलंच.  खरं तर पुन्हा जन्म मिळत नाही. पण जर मला खरंच जन्म मिळाला तर मला लता मंगेशकर व्हायचं नाही. कारण लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील त्रास फक्त त्यांनाच माहीत आहे.


लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे अनेक दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारलीही होता. मात्र शनिवारी पुन्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या व्हेंटिलेटरवर गेल्या. त्यानंतर आज लतादीदींनी अखेर जगाचा निरोप घेतला.