Janhvi Kapoor Sridevi Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या आईच्या अर्थात पाऊलावर पाऊल ठेव चालताना दिसत आहे. आज तर श्रीदेवी यांचा जन्म दिवस आहे आणि त्यानिमित्तानं जान्हवी ही तिरुपती बालाजीचं दर्शन करण्यासाठी पोहोचली आहे. दरवर्षी प्रमाणे तिनं यंदाही श्रीदेवी यांच्या जन्म दिवशी बालाजीचं दर्शन घेतलं आहे. त्याचे काही फोटो जान्हवीनं शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. जान्हवीनं या पोस्टमध्ये एक तिरूपती बालाजीच्या पायऱ्यांचा फोटो शेअर केला आहे. तर दुसरा हा श्रीदेवी आणि जान्हवी दिसत आहेत. तर तिसरा फोटो हा जान्हवीनं स्वत: चा शेअर केला आहे. या फोटोत तिनं पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर हे फोटो शेअर करत तिनं कॅप्शन दिलं की आई वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबत तिनं लाल रंगाचं इमोटीकॉन शेअर केलं आहे. आई खूप खूप प्रेम. 



दरम्यान, जान्हवीची धाकटी बहीण खूशी कपूरनं याआधी आई श्रीदेवी आणि जान्हवी कपूरसोबत फोटो शेअर केला होता. त्यानंतर बोनी कपूर यांनी देखील श्रीदेवींचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो 2012 इंग्लीश विंगलिश या चित्रपटातील आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की 'वाढदिवसाच्या शुभेच्छा जान.'


श्रीदेवी या बॉलिवूडच नाही तर भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी जवळपास 5 दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांच्या अभिनयानं त्यांनी सगळ्यांना भुरळ पाडली होती. त्यांनी फक्त हिंदीच नाही तर त्यासोबत तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये देखील चित्रपट केले आहेत. तर त्यांचे 2018 मध्ये निधन झाले. 


हेही वाचा : प्रियांका चोप्राच्या लेकीचा हा Cute Video होतोय व्हायरल, 'ओह माय गॉड' बोलत...


दरम्यान, जान्हवी कपूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'देवारा : पार्ट 1' या चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय ती 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' आणि सुर्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.