Priyanka Chopra's Daughter Maltis Cute Video : हॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनस हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. इतकंच नाही तर निक हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. त्याच्या सोशल मीडियावर पत्नी प्रियांका आणि लेक मालती मेरी दिसते. दरम्यान, आता त्यानं शेअर केलेला मालती मेरीचा एक सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
निकनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मालती त्याला हेअरकट देत असल्याचं पाहायला मिळतं. तर त्या ती तोतलं बोलताना दिसते. पण मालती नक्की काय बोलते हे कळतच नाही आहे. तर निक तिचे आभार मानताना दिसतोय. मात्र, जेव्हा मालती त्याचे केस कापते तेव्हा तिच्याकडे काही खरी कैची नाही तर खेळण्यातील आहे. त्याशिवाय मालतीचा आणखी एक व्हिडीओ त्यानं शेअर केला आहे. त्यात ती ओह माय गॉड बोलताना दिसते. त्यानंतर ती सोफ्याकडे पाहून चेहरा लपवताना दिसते.
प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट 'द ब्लफ' आणि 'हेड्स ऑफ स्टेट' ची शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर निक जोनस ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये पत्नी आणि लेक मालतीला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यानं तिच्यासोबत खूप वेळ व्यथित केला. प्रियांका चोप्रानं देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. ज्यात तिघं मस्ती करताना दिसत आहेत. याशिवाय त्यानं 'द ब्लफ' च्या सेटवरून काही बिहाइंड द सीन देखील शेअर केले होते. सगळ्यात शेवटी त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात प्रियांकाची आई म्हणजेच मधू चोप्रा दिसत आहेत. या पोस्टला शेअर करत निकनं 'काही काळापासून' अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा : KBC 16: बिग बींनी विचारला 25 लाख रुपयांसाठी महाभारतासंबंधातील प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
दरम्यान, प्रियांकानं देखील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यात प्रियांकानं तिच्या शेड्यूल रॅप झाल्याची घोषणा केली. तिनं कॅप्शन दिलं की हे द ब्लफच्या रॅपअपचे फोटो आहेत. हा चित्रपट करताना माझं कुटुंब माझ्यासोबत होतं आणि या चित्रपटाला सक्सेसफूल बनवण्यासाठी यशस्वी लोकांची साथ असणं हे खूप मोठं सौभाग्य असतं.
LIVE|
NAM
199/3(20 ov)
|
VS |
PAK
39/2(5.2 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 122/6
|
VS |
SA
123/4(13.2 ov)
|
| South Africa beat United Arab Emirates by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SCO
(20 ov) 170/7
|
VS |
NEP
171/3(19.2 ov)
|
| Nepal beat Scotland by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 173/4
|
VS |
NZ
176/2(15.1 ov)
|
| New Zealand beat Canada by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.