मुंबई : बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी जान्हवी कपूरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी दुबईत गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे अचानकपणे जाणे हे त्यांच्या चाहत्यांसह सगळ्यांनाच धक्कादायक होते. 


दुबईत बोनी कपूर, धाकटी मुलगी आणि श्रीदेवी लग्नसोहळ्यासाठी गेल्या होत्या. यावेळी ही दुर्घटना घडली. श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवी धडक या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने दुबईला जाऊ शकली नव्हती. 


लग्न तर पार पडले मात्र त्यानंतर जी बातमी आली ती मुंबईत असलेल्या जान्हवीसाठी पायाखालची जमीनच सरकवणारी होती. नेहमी सावलीसारखी असणारी आई जान्हवीने अचानक गमावली होती. 


एका मुलीसाठी आपल्या आईचे आयुष्यातून कायमचे निघून जाणे ही गोष्टच खूप दु:खदायक आहे. जान्हवीसाठी आई हेच तिचे सर्वस्व होते. त्यामुळे तिच्या अचानक जाण्याने जान्हवीच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झालीये जी कधीही भरुन निघणार नाही. 


जान्हवीने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकताना आईप्रतीच्या भावना व्यक्त केल्यात. जान्हवीसाठी तिची आई म्हणजे तिचा आत्मा, तिची मैत्रीण, जगण्याचे कारण होते. 



 


जान्हवीची ही भावनिक पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहणार नाही. 


जान्हवी 'धडक' या सैराटचा हिंदी रिमेक असलेल्या सिनेमातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय. आपल्या लेकीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा मात्र श्रीदेवींची अधुरी राहिली. आपल्या मुलीच्या बॉलीवूड पदार्पणाबाबत श्रीदेवी खूपच उत्सुक होत्या. मात्र हे त्यांचे स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही.