Janhvi Kapoor on her First Relationship : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. जान्हवी ही  तिच्या कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. काही दिवसांपासून जान्हवी तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत बऱ्याचवेळा स्पॉट होते. सध्या जान्हवी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. ते म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिलाचा स्वाइप राइट शो. या कार्यक्रमात कुशानं खुलासा केला की तिच्या आई-वडिलांनी तिच्या बॉयफ्रेंडला अप्रुव्ह केले नव्हते. त्यामुळे तिनं रिलेशनशिप संपवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवीनं या शोमध्ये म्हटलं आहे की माझा पहिला सीरियस बॉयफ्रेंड तोच होता जेव्हा आपण लपून छपून भेटनं. ते पण खोट सांगून पण दुर्दैवानं हे नातं संपुष्टात आलं कारण मला माझ्या आई-वडिलांना खूप खोटं बोलावं लागलं. त्यांचं म्हणणं होतं की तुझा कधीच बॉयफ्रेंड नसेल. या गोष्टीला घेऊन ते खूप पारंपरिक विचार करणारे होते. तेव्हा मला या गोष्टीची जाणीव झाली की आई-वडिलांची संमती असणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांच्यासोबत या गोष्टीवरून त्यांच्यासोबत पारदर्शक असल्यावर सगळ्या गोष्टी किती सहज होतात. तुमच्या या निर्णयांवरून तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे जान्हवी म्हणाली की बॉलिवूडनं तिची प्रेमाची संकल्पना आणि अपेक्षा खूप जास्त वाढवली आहे. 'खिडकीतून बाहेर... असेल्या पावसाला बघायला खूप मज्जा येते.'


सध्या चर्चा अशी सुरु आहे की जान्हवी ही सध्या शिखर पहाडियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या महिन्यात ते दोघे एकत्र अर्जुन कपूरच्या घरी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पोहोचले. शिखरनं 31 मार्च रोजी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्च कार्यक्रमात आणि अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमात बोनी कपूर यांच्यासोबत स्पॉट करण्यात आले. 


हेही वाचा : 'खान मंडळींसोबत काम करत असाल तर...', सुष्मिता सेननं स्पष्टच सांगितलं चित्रपटसृष्टीतील ते वास्तव


शिखर आधी जान्हवीचे नाव ओरहानसोबत देखिल जोडण्यात आले होते. शिखर पहाडियाविषयी बोलायचे झाले तर तो महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. त्यासोबत तो एक व्यावसायिक आहे. शिखर आणि जान्हवी यांचे रिलेशनशिपविषयी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. जान्हवी कधी शिखरसोबत रिलेशनशिपमध्ये होती ही गोष्ट समोर आली होती. तर जान्हवीच्या वाढदिवसानिमित्तानं शिखरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जान्हवीचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लाल रंगाचं हॉर्ट इमोटिकॉन वापरलं होतं.