Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून ताली या तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तिची ही वेब सीरिज प्रेक्षकांची मने जिंकते. या वेब सीरिजमधील तिचा दर्जेदार अभिनय हा चांगलाच चर्चेत ठरतोय. या सीरिजमध्ये सुष्मिता सेननं तृतीयपंथीची भूमिका साकारली आहे. या सगळ्यात सुष्मिता ही तिच्या आगामी सीरिज 'आर्या' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सुष्मितानं खुलासा केला आहे की ती सेटवर नेहमीच वेळेत यायची आणि वेळेत शूट संपवून निघून जायचं. त्यामुळे अनेक कलाकारांना त्रास व्हायचा. त्यात बॉलिवूडमधील खान अभिनेते देखील आहेत. यावेळी पुढे सांगत सुष्मिता म्हणाली की ती नेहमीच वेळ पाळते.
जेव्हा सुष्मितानं तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा तो काळ तिच्यासाठी खूप कठीण होता. त्यावेळ तिला कशा प्रकारे ए लिस्टर कलाकारांसोबत काम करताना कोणत्या समस्या आल्या ते सांगितले. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता सेननं सांगितलं की 'जेव्हा ती इंडस्ट्रीमध्ये आली होती. तेव्हा असं होतं की तुम्ही जर कधी ए लिस्टर्स किंवा मग खान पैकी कोणासोबत काम करत आहात, तर अशा वेळी तुमची शिफ्ट किती तासांची असेल किंवा किती दिवस तुम्ही शूटिंग करणार आहात हे सगळं विचारायचं नसतं. मी त्यांच्याशी 8 तासाची शिफ्ट करणार अशी बोलनी केली होती. हेअर आणि मेकअप धरला तर 10 तास देईन. मी वेळेत येणार आणि वेळेत जाणार. आजही मी हा नियम तसाच फॉलो करते. मी कधीच लेट पोहोचत नाही, पण वेळेत जाईन. त्या गोष्टीचा अनेकांना त्रास होऊ लागला होता. त्यांना वाटलं की हिला अॅटिट्यूड आहे. स्वत: ला काय समजते. असं कोण करतं?'
सुष्मिता पुढे सांगत म्हणाली की त्यानंतर एका निर्मात्यानं माझ्यासगळ्या अटी मान्य करत मला चित्रपटासाठी साइन केलं कारण त्यांना ही गोष्ट जाणवली की माझ्यामुळे प्रोडक्शनचा खर्च वाचतोय कारण सगळ्या गोष्टी वेळेत होत आहेत.'
यावेळी उदाहरण देत सुष्मितानं 'आंखें' या चित्रपटाचा उल्लेख केला. या चित्रपटात सुष्मितासोबत अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि परेश रावल होते. सगळेच सेटवर असायचे पण ती तिची शिफ्ट संपवून निघून जायची. सुष्मिता म्हणाली की मी त्यांना विनवण्या करायचे की माझी शिफ्ट संपली आहे. हे कोणाचाही अपमान करते असं नव्हतं फक्त जे ठरवलं आहे ते फॉलो करणं होतं. याला बॅकफायर देखील करण्यात आले आणि अनेकांनी म्हटलं की तिच्यासोबत काम करणं कठीण आहे. कोणी असं बोलत नाही की वेळेत या. तुम्ही अभिनेत्यासाठी 6-6 तास वाट पाहू शकतात. तेव्हा कोणी काही बोलत नाही. मी हेअर आणि मेकअप करून सहा तास प्रतिक्षा करतायचे आणि माझ्या पॅकअपची वेळ झाली की त्याना लगेच त्रास व्हायचा.
हेही वाचा : किती लुटणार? मुंबई-पुणे टोल नाक्यामुळं अभिनेता-कवी सौमित्रला मनस्ताप, संतापाच्या भरात विचारला जाब
याविषयी आता लोक काय म्हणतात हे सांगत सुष्मिता म्हणाली की 'आज याच गोष्टीला धरून 30 वर्षांनंतर लोक तिचा आदर करतात. तुम्ही वेळेवर असायला हवं.'