जान्हवी कपूरच्या वडिलांचं मोठं वक्तव्य, `माझ्या मुलीचा विश्वासघात....`
बापाला सतावतेय मुलीची काळजी...
मुंबई : प्रत्येक वडिलांसाठी मुलीचं सुख आणि आनंद अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. अगदी सर्वसामान्य बापाचं मुलीवर असलेलं प्रेम आणि सेलिब्रिटी बापाच्या मनात मुलीसाठी असलेली काळजी अनेकदा दिसून येते. निर्माते बोनी कपूर यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. ज्यामध्ये त्यांनी गंमतीत मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.
बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर एक फोटो ज्यामध्ये जान्हवी अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी कौशलसोबत UNO खेळताना दिसत आहे. दोघांचा एकत्र फोटो शेअर करत बोनी कपूर यांनी कॅप्शनमध्ये, ''मसुरी मै मिली' सिनेमाचे शूटिंग करताना UNO ब्रेकचा आनंद लुटला. माझ्या मुलीचा कोणी विश्वासघात करणार नाही, याची मी काळजी घेत आहे' असं लिहिलं आहे.
फोटोमध्ये सनी आणि जान्हवीच्या कनेक्शनसोबतचं बोनी कपूर यांच्या विनोदालाही युजर्सकडून दाद मिळत आहे. सध्या सनी कौशल आणि जान्हवी कपूरच्या फोटोची आणि जान्हवीच्या वडिलांनी लेकीसाठी लिहिलेलं कॅप्शन तुफान व्हायरल होत आहे.
सनीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, राधिका मदनसोबत 'शिद्दत' सिनेमात सनी झळकला होता. सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता सनी 'मसुरी मै मिली' आणि 'हुरडांग' सिनेमाच्या माध्यमातून समोर येणार आहे. मिलीमध्ये जान्हवी कपूर, सनी कौशल आणि मनोज पाहवा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.