Jasmin Bhasin : अभिनेत्री जस्मिन भसीनला काही दिवसांपूर्वी डोळ्यांना दुखापत झाली होती. तिचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर अभिनेत्रीने एक मोठी अपडेट दिली आहे. तिने थेट एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितले आहे की, तिची प्रकृती आता चांगली झाली आहे. त्यासोबतच ती या व्हिडीओमध्ये एका मेडिकल टीमसोबत दिसत आहे. ज्यामध्ये कॉन्टॅक्ट लेन्सबद्दलचे गैरसमज दूर करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, माझ्या डोळ्यांच्या अपघातादरम्यान माझ्यासोबत काय घडले याची भीतीदायक आणि चुकीची माहिती सांगणारे बरेच लोक मला दिसत आहेत. तसेच, बरेच लोक आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे देखील टाळत आहेत.  मी लेन्स वापरत आहे. त्यासोबतच या माझ्या प्रवासात माझ्यासोबत असलेले डॉक्टर आणि तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनेत्रीने खूप खूप आभार मानले आहेत. 


पाहा व्हिडीओ


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नेमकं काय घडलं होतं?


17 जुलै रोजी अभिनेत्री  जस्मिन भसीनला डोळ्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्री ही दिल्लीत एका कार्यक्रमाला गेली होती. जिथे तिने कॉन्टॅक्ट लेन्स घातली होती. त्यामुळे तिच्या डोळ्यात खूप वेदना होत होत्या. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले आणि नंतर समजले की, तिच्या डोळ्यांना दुखापत झाली आहे. त्यानंतर तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेली होती आणि त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


त्यानंतर अभिनेत्री म्हणाली की, हे सर्व घडल्यानंतर आम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी मला सांगितले की माझ्या डोळ्यांना दुखापत झाली आहे. त्यांनी माझ्या डोळ्यांवर मलमपट्टी केली. दुसऱ्या दिवशी मी मुंबईला गेले आणि मुंबईत उपचार सुरु ठेवले. 


टीप: ही माहिती सर्वसाधारण आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.