Richard Dawkins Award पुरस्काराने जावेद अख्तर सन्मानित
पहिले भारतीय नागरिक ठरले जावेद अख्तर
मुंबई : लोकप्रिय लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना (Richard Dawkins Award) रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मानवी विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करणे आणि विचारक्षमता यासाठी जावेद अख्तर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. महत्वाच म्हणजे हा पुरस्कार प्राप्त करणारे जावेद अख्तर हे पहिले भारतीय ठरले आहेत.
सोशल मीडिया असो किंवा विविध शहरांमध्ये आयोजित केलेली चर्चा सत्र असोत. जावेद अख्तर आपली परखड मत मांडत असतात. सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), तबलिगी जमात, इस्लामोफोबिया यावरुन जावेद अख्तर यांनी आपली सडेतोड मत व्यक्त केले होते.
जावेद अख्तर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांनी हा पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय जावेद अख्तर असल्याची माहिती दिली. तसेच या अगोदर हा पुरस्कार अमेरिकेतील विनोदवीर बिल मगर आणि दार्शविक क्रिस्टोफर हिचेंस यांना देण्यात आला होता.
जावेद अख्तर यांना पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी तसेच पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांना २०२०मधील रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार २००३ पासून दिला जात आहे. ब्रिटिश विकासवादी आणि बायोलॉजिस्ट रिचर्ड डॉकिन्स यांच्या नावाने दिला जातो.