Priyamani Jawan Controversy: 'जवान' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगलेली आहे. हा चित्रपट आता हिटही झाला आहे. परंतु आता चित्रपट हिट झाल्यानंतर मात्र वेगळंच सत्य समोर येतं आहे. या चित्रपटातून अभिनेत्री प्रियामणीही दिसली आहे. तुम्हाला आठवत असेलच ही प्रियामणी कोण ते? 2013 साली आलेल्या चेन्नई एक्सप्रेसमधून दिसली होती. '1234 गेट ऑन द डान्स फ्लोअर' या गाण्यातून ती शाहरूख खानसोबत नाचली होती. एका मुलाखतीदरम्यान शाहरूखनं सांगितले होती ती तिच्या डान्समधील गुरू आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. तेव्हा आता चर्चा आहे ती म्हणजे तिनं अटली कुमारवर केलेल्या आरोपांची. त्यामुळे तिची चांगली चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. या चित्रपटातून एकाच वेळी नयनतारा, शाहरूख खान, प्रियामणी, विजय सेतुपती हे दिसले आहेत. शाहरूख खान नायक आहे तर विजय सेतुपती हा खलनायक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु या चित्रपटातून काम करणाऱ्या प्रियामणी या लोकप्रिय अभिनेत्रीनं मात्र दिग्दर्शक अटली कुमार यांच्यावर एक आरोप केला आहे ज्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. प्रियामणी हिनं या चित्रपटातून लक्ष्मी हे पात्रं निभावलं आहे. शाहरूख खानच्या गर्ल स्कॉडमधील ही एक आहे. आधी म्हणजे हा चित्रपट रिलीज होण्यापुर्वी या चित्रपटातून विजय सेतूपती हा कॉमिओ करणार आहे परंतु नंतर स्पष्ट झाले की विजय हा खलनायक आहे. 


सध्या न्यूज 18 नं दिलेल्या रिपोर्टनुसार कळते की, प्रियामणीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचं कारण सांगितलं आहे. ती हा आरोप काय आहे हे पाहुया. ती म्हणते की अटली कुमार यांनी तिला पुर्ण कल्पना दिली होती या चित्रपटातून विजय सेतुपती दिसणार आहे. तेव्हा प्रियामणी या गोष्टीनं खूपचं उत्सुक झाली होती. त्यावेळीही तिलाही विजय सेतूपतीसोबत काही सीन्स करायचे होते. तेव्हा यासाठी अटली कुमार तयारही झाले होते. परंतु हे काही घडलं नाही. त्यामुळे प्रियामणी फारच निराश झाली. यावेळी ती गमतीत म्हणाली की, 'अटलीनं माझ्यावर चाल केली, मला फसवलंय.'


यावेळी शाहरूखनं मात्र या चित्रपटात डान्स करताना प्रियामणी ही माझ्या मागे नाही तर माझ्या बाजूला उभी राहूनच नाचेल असा आग्रह धरला होता. याचे कारणही सुरूवातीला सांगितले आहे. चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरूख खानसोबत तिनं महत्त्वाचा डान्स केला आहे. त्याचसोबत शाहरूख खान हा तिला गुरू मानतो.