मुंबई : हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) नुकतीच तिचा जुना जोडीदार बेन अॅफ्लेकसोबत विवाहबंधनात अडकली आहे. लास वेगासमध्ये झालेल्या या लग्नात फक्त कुटुंब आणि नातेवाईकांव्यतिरिक्त जवळच्या काही मित्रांनीही हजेरी लावली होती. जॉर्जियातील सवाना येथे अॅफ्लेकच्या घरी हा विवाह सोहळा सुमारे तीन दिवस चालला. आता ही बातमी समोर आली आहे की जेनिफर लग्नात सहभागी झालेल्या काही लोकांवर चिडली असून आलेल्या पाहुण्यांनी त्यांच्या लग्नाचा फायदा घेत, लग्नाचे व्हिडीओ TMZ ला विकले आहेत. 


आणखी वाचा : 'या' कारणामुळे टायगर श्रॉफला कधी डेट करणार नाही, चारचौघात अभिनेत्रीची अजब प्रतिज्ञा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेनिफर लग्नात आलेल्या पाहुण्यांवर आरोप करत म्हणाली,'आमच्या परवानगीशिवाय त्यांनी हे केलं आहे. ज्यांनी कोणी हे केलं त्यांनी आमच्या खासगी क्षणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे.' जेनिफरच्या एका फॅन अकाऊंटवरून तिची ही कमेंट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'तुम्हा हे कसं मिळालं हे मला माहित नाही, कारण आमचं नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट होतं आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं की आमच्या लग्नाशी संबंधीत काही शेअर करू नका. हे आमच्यावर अवलंबून होतं की आम्ही काय शेअर करायचं आणि काय नाही.'


आणखी वाचा : ब्रालेटमध्ये मराठी गाण्यावर 'दयाबेन'चा ठुमका; वारंवार पाहिला जातोय 'हा' Video



आणखी वाचा : कल्पना नसतानाच स्वत:चे Topless Photo पाहून काजल अग्रवाल हादरली; पुढे जे घडलं ते...


जेनिफर हे देखील, म्हणाली की मला जे काही शेअर करायचं आहे ते तिच्या OnTheJLO साइटवर असेल आणि ते देखील जेव्हा मी शेअर करण्यास तयार असेल तेव्हा. तेव्हा पुढे म्हणाली, 'आमच्या संमतीशिवाय शेअर करण ही चोरी झाली आहे आणि ते सगळं पैशासाठी विकण्यात आलं आहे. आय लव्ह यू मित्रांनो.'


आणखी वाचा : बीफ आवडतं..., 'त्या' व्हिडीओवरून रणबीर कपूरच्या 'ब्रम्हास्त्र'वर होणार परिणाम?


2002 मध्ये दोघांनी साखरपुडा केला पण लग्नाआधी 2004 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. यानंतर जेनिफर तीन वेळा लग्नबंधनात अडकली आहे, परंतु जेनिफरचं कोणाशीही पटलं नाही. मार्क अँथनीशी जेनिफरचं नातं सर्वात जास्त काळ टिकलं. 2004 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि 10 वर्षांनी 2014 मध्ये विभक्त झाले.