बीफ आवडतं..., 'त्या' व्हिडीओवरून रणबीर कपूरच्या 'ब्रम्हास्त्र'वर होणार परिणाम?

रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 29, 2022, 12:52 PM IST
बीफ आवडतं..., 'त्या' व्हिडीओवरून रणबीर कपूरच्या 'ब्रम्हास्त्र'वर होणार परिणाम? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटावर बऱ्याच दिवसांपासून बॉयकॉट करण्याची मागणी चाहते करत आहेत. आता त्याचे काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात रणबीरचा एक 11 वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रणबीरनं केलेलं वक्तव्य ऐकून लोकांना धक्का बसला आहे. 

आणखी वाचा : ललित मोदींच्या अनुपस्थितीत सुष्मिता Ex Boyfriend रोहमन शॉलसोबत हे काय करतेय?

रणबीरचा हा व्हिडीओ एका नेटकऱ्यांनं ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत रणबीर बोलतो की 'त्याला बीफ खायला आवडतं!' रणबीरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना प्रचंड राग आल्याचं पाहायला मिळतं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ट्विटरवर 'ब्रह्मास्त्र'वर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे हा व्हिडीओ एडिट केल्याचं रणबीरच्या चाहत्यांचे म्हणणं आहे. 

हा व्हिडीओ 2011 चा असल्याचे म्हटले जात आहे. एका मुलाखती दरम्यान रणबीर त्याला मटण, पाया, रेड मीट आवडतं असल्याचं म्हणतो. यावेळी तो बोलतो की 'मला बीफ खायला खूप आवडतं आणि त्यासोबत बदक पण आवडतं.' हा व्हिडीओ एडिट केल्याचा दावा काही नेटकरी करत आहेत. 

या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'ब्रह्मास्त्र' ला बॉयकॉट करण्यासाठी आणखी एक कारण मिळालं, नाव किंवा आडनाव काहीही असो, बॉलिवूडमध्ये असलेले सगळे एकसारखे आहेत.'  दुसरा नेटकरी म्हणाला की, 'फक्त पब्लिसिटी स्टंट करा. मलाही दक्षिण संस्कृती आवडते, पण सत्य हे आहे की बॉलिवूडमुळे हिंदू संस्कृती नष्ट होत आहे. दक्षिणेचे चाहते तुमच्या खोट्या प्रेमाचे समर्थन करणार नाहीत.'

आणखी वाचा : मानधनाच्या बाबतीत अल्लू अर्जुननं 'किंग' शाहरुखलाही टाकलं मागे; 'पुष्पा 2' साठी घेतोय 'इतकं' मानधन

'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त आलिया भट्ट (Alia Bhatt), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna), मौनी रॉय (Mouni Roy) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचा निर्माता करण जोहरनं अलीकडेच सांगितले की, 2 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये एक प्री-रिलीज कार्यक्रम होणार आहे, ज्यामध्ये RRR स्टार ज्युनियर NTR प्रमुख पाहुणा म्हणून दिसणार आहे.