ब्रालेटमध्ये मराठी गाण्यावर 'दयाबेन'चा ठुमका; वारंवार पाहिला जातोय 'हा' Video

दयाबेनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 29, 2022, 02:32 PM IST
ब्रालेटमध्ये मराठी गाण्यावर 'दयाबेन'चा ठुमका; वारंवार पाहिला जातोय 'हा' Video title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta ka Ooltah chashmah ) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. मालिकेती जेठालाल, तारक मेहता, बबीता, बापुजी आणि दयाबेन हे कलाकार तर नेहमीच प्रेक्षकांच्या आठवणीत राहणारे आहेत. मालिकेत दयाबेन ही सुंदर सुशील सून दाखवण्यात आली. दयाबेनची (Dayaben) भूमिका अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) साकारत आहे. मालिकेत नेहमी साडीत दिसणाऱ्या दिशाचा एक बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 

आणखी वाचा : कल्पना नसतानाच स्वत:चे Topless Photo पाहून काजल अग्रवाल हादरली; पुढे जे घडलं ते...

दिशाचा हा जुना व्हिडीओ 2016 चा आहे. या व्हिडिओमध्ये दिशा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यामध्ये ती 'भिंगरी ग भिंगरी' या म्युझिक व्हिडिओमध्ये डान्स करताना दिसतेय. हे एक मराठी गाणं असून ते गायिका वैशाली सामंत हिने गायलं आहे. व्हिडीओत दिशानं शिमरी ब्रालेट आणि मिनिस्कर्ट परिधान केलं आहे. 

आणखी वाचा : बीफ आवडतं..., 'त्या' व्हिडीओवरून रणबीर कपूरच्या 'ब्रम्हास्त्र'वर होणार परिणाम?

आणखी वाचा : ललित मोदींच्या अनुपस्थितीत सुष्मिता Ex Boyfriend रोहमन शॉलसोबत हे काय करतेय?
'तारक मेहता' या मालिकेत नेहमी गरब्याच्या गाण्यावर डान्स करणाऱ्या दिशाचं बोल्ड अंदाज समोर आला आहे. दिशाचा हा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला 20 लाख पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला,' दयाचा डान्स पाहून जेठालाल, बापूजी आणि टप्पू शॉक झाले असतील.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हा व्हिडीओ पाहिल्यानंतर टप्पूचे वडील बबिताला विसरले असतील.' तिसरा नेटकरी म्हणाला, ' जेव्हा जेठालाल बाहेर जातो तेव्हा.' अशा अनेक मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.