मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी 'जुग जुग जिओ' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशन दरम्यानच्या मुलाखतीत वरुण धवनने एक मोठा खुलासा केला आहे. वरुणने आयुष्यात त्याला ज्या गोष्टींची भिती वाटते याची माहिती दिली. ही गोष्ट एकूण अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुण धवनच्या जुग जुग जिओ चित्रपटातील एका सीनमध्ये त्याच्या शरीरावर टॅटू दिसत असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर एबीसीडी २ या चित्रपटातही वरुणच्या शरीरावर टॅटू काढण्यात आले होते. त्यामुळे वरुण धवनला एका मुलाखतीत चित्रपटांमध्ये तुम्हाला टॅटूचे शौकीन दाखवले जाते, वास्तविक जीवनात असे असते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. 


यावर वरुण धवनने उत्तर दिले की, मला टॅटूच्या नावानेच भीती वाटते, मला टॅटू काढण्यात रस नाही. यावर बॉलीवूड अभिनेत्री नीतू कपूरनेही वरुण धवनचे समर्थन केले आणि म्हटले की, देवाने चांगली बॉडी दिली आहे, त्यावर टॅटू गोंदवून का बिघडवायचे असे त्या म्हणाल्या. 


दरम्यान, वरुण धवनच्या आगामी 'जुग जुग जिओ' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 24 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटात वरुण धवनसोबत कियारा अडवाणीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर अनिल कपूर आणि नीतू कपूरही हे मोठे स्टार देखील असून हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे.