काजल अग्रवाल घेतेय कलारीपयट्टूचं प्रशिक्षण; करतेय आगामी प्रोजेक्टची तयारी?
चार महिन्यांपूर्वी बाळाला जन्म देणारी अभिनेत्री काजल, कलारीचा सराव करण्यासोबतच घोडेस्वारीही शिकत आहे.
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालने सांगितलं की, प्राचीन मार्शल आर्ट ही एक सुंदर प्रथा आहे जी साधकाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करते. काजलने खुलासा केला आहे की, ती तीन वर्षांहून अधिक काळ कलारीपयट्टू शिकत आहे. कलारी सत्रादरम्यान स्वत:चा एक व्हिडिओ पोस्ट करत काजलने लिहिलं, "कलारीपयट्टू ही एक प्राचीन भारतीय मार्शल आर्ट आहे. ज्याचा अर्थ - युद्धक्षेत्रातील कलेचा सराव करणं."
अभिनेत्री पुढे म्हणाली, ''या कला प्रकाराची जादू शाओलिन, कुंग फू आणि परिणामी कराटे आणि तायक्वांदोच्या जन्मात विकसित झाली. कलारीचा वापर सामान्यतः गनिमी युद्धासाठी केला जात होता आणि ही एक सुंदर प्रथा आहे जी साधकाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करते. तीन वर्षांमध्ये मधूनमधून हे शिकल्याबद्दल कृतज्ञ!
सीवीएन कलारी हुशार आणि खूप धीर देणारी आहे. जे मला माझ्या सर्वोत्कृष्ट क्षमतेनुसार वेळोवेळी वेगवेगळ्या प्रमाणात शिकण्याची आणि कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन करते. इतके छान शिक्षक असल्याबद्दल धन्यवाद."
विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी बाळाला जन्म देणारी अभिनेत्री काजल, कलारीचा सराव करण्यासोबतच घोडेस्वारीही शिकत आहे. असे IANS च्या वृत्तात म्हटलं आहे. इतकंच नाही तर ती दिग्दर्शक शंकर यांच्या बहुप्रतिक्षित 'इंडियन 2' च्या शूटिंगसाठी परतली आहे. ज्यामध्ये कमल हासन मुख्य भूमिकेत आहे.