मुंबई : अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच आई होणार आहे. नुकताच, काजल अग्रवालचा बेबी शॉवर सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये तिने लाल साडी नेसली होती. काजल अग्रवालने तिचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत खूप आनंदी दिसत आहे. या फोटोंवर काजलचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेबी शॉवर निमित्ताने अभिनेत्री काजल अग्रवालने तिचा पती गौतम किचलूसोबत पोज दिल्या. या फोटोंमध्ये दोघंही खूप सुंदर दिसत आहेत. याचबरोबर अभिनेत्री काजल अग्रवालच्या बेबी शॉवर सोहळ्यात त्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावून त्यांना आशीर्वाद दिला. समोर आलेल्या फोटोंमध्ये संपूर्ण कुटुंब खूप आनंदी दिसत आहे.


काजल अग्रवालने पतीसोबत पोज देत आपला बेबी बम्प फ्लॉन्ट केला या दोघांच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. Kajal Aggarwal आणि गौतम किचलूला घरच्यांचा आशीर्वाद देत बेबी शॉवर सेरेमनीमध्ये या दोघांवरही त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला.



अदाकारी काजल अग्रवालने ओठी भरणीच्या निमीत्ताने लाल रंगाची साडी परिधान केली होती या साडीत अभिनेत्री खूप सुंदर दिसत होती.



Kajal Aggarwal ला मिळाला फँन्सचा आशीर्वाद
काजल अग्रवालला फँन्सचा आशिर्वाद मिळत आहे. फँन्स काजलच्या फोटोवर जोरदार कमेंन्ट करत आहेत आणि त्याच्यां होणाऱ्या बाळाला आशिर्वादही देत आहेत