पती अजय देवगणवर खटला दाखल करेन आणि तो सगळे गुन्हे कबूल करेल; Kajol चा मोठा खुलासा
Kajol on Ajay Devgn : काजोल लवकरच `द ट्रायल` या सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये काजोल एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून त्याच दरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत काजोलला विचारण्यात आलं की तिला कोणाला ट्रायलवर ठेवशील... त्यावर काजोलनं पती अजय देवगणचं नाव घेतलं.
Kajol Upcoming Web Series: बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. काजोल ही तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. काजोल गेल्या काही दिवसांपासून 'लस्ट स्टोरी 2' (Lust Stories 2) या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काजोलनं आजवर बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता काजोल 'द ट्रायल' या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात काजोल एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या काजोलला एका मुलाखतीत सगळ्यात आधी कोणाला ट्रायलवर ठेवणार असा प्रश्न विचारला असता. काजोलनं तिचा पती अजय देवगणचं नावं घेतलं.
काजोलनं ही ईटाइम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सगळ्यात आधी कोणत्या व्यक्तीला ट्रायलवर ठेवणार असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत काजोल उत्तर देत सांगितलं की, "मी अजय देवगणवर खटला चालवेल आणि मला याचे कारण सांगायची काही गरज नाही. एक पती असणंच याचं मोठ कारण आहे. त्यासोबतच मला खात्री आहे मी जितकं त्याला ओळखते, तो त्याचे सगळे गुन्हे कबूल करेल."
ओटीटीमुळे 90 च्या दशकातील अभिनेत्री ज्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी काम करणं बंद केलं होतं. त्यांना आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येत आहे. 90 च्या दशकातील अनेक अभिनेत्री ओटीटीकडे वळत आहे. याविषयी विचारता काजोल म्हणाली "मी स्वत: ला कधीच हीरो समजले नाही. मला नेहमी वाटतं की माझी भूमिका चांगली असू शकते, पण एक चित्रपट किंवा सीरिजमध्ये काम करणारे सगळ्याच लोकांमुळे ही भूमिका चांगली होते. जर माझा सह-कलाकार चांगला नसेल किंवा चांगला दिग्दर्शक नसेल तरी देखील मी सीन्स चांगले करू शकणार नाही. एक चांगला चित्रपट बनवण्यामागे सगळ्यांचे योगदान असते."
हेही वाचा : वाढती जवळीक? Ajay Devgn नं काजोलला 'या' अभिनेत्यासोबत काम करण्यास दिलेला नकार!
या शोला होकार का दिला याविषयी बोलताना काजोल म्हणाली, "शोची क्रिएटर सुपर्ण वर्मानं सांगितलं की द गुड वाइफ ही एक परदेशातील कॉन्सेप्ट आहे. याला आपण आपल्या समाजात, संस्कृतीत आणायला हवी. जर तुम्ही हे सगळं तुमच्या पटकथेत ठेवलं तर तुमच्या चित्रपटाची कथा ही खराब होते किंवा भावनिक होते. या सगळ्या गोष्टी पटकथेत घेतल्यानंतर असं काही होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. जेव्हा मला वाटलं की ही सीरिज चांगल्या प्रकारे बनवली जाऊ शकते तेव्हा मी या शोला होकार दिला.