वाढती जवळीक? Ajay Devgn नं काजोलला 'या' अभिनेत्यासोबत काम करण्यास दिलेला नकार!

Ajay Devgn and Kajol : काजोलनं आजवर अनेक कलाकारांसोबत काम केलं होतं पण तिची केमिस्ट्री एका कलाकारासोबत प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हे पाहता काजोल आणि त्याच्याविषयी चर्चा न होता दुसऱ्या कलाकारासोबतच्या चर्चा पाहता अजनं काजोलला त्या कलाकारासोबत काम करण्यास नकार दिला होता. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 5, 2023, 11:27 AM IST
वाढती जवळीक? Ajay Devgn नं काजोलला 'या' अभिनेत्यासोबत काम करण्यास दिलेला नकार! title=
(Photo Credit : Ajay Devgn Instagram)

Ajay Devgn : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची जोडी पावर कपल म्हणून ओळखली जाते. काजोल तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काजोल आणि अजय यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण काजोल स्क्रिनवर कोणासोबत चांगली दिसले असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान असे उत्तर सगळेच देतील. काजोल आणि शाहरुखनं बाजीगर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे हे चित्रपट आजही प्रेक्षक हौशीनं पाहतात. दरम्यान, तुम्हाला माहितीये का? एक वेळ अशी आली होती की शाहरुखला घेऊन अजय इन्सिक्योर झाला होता आणि त्यानं काजोलला शाहरुखसोबत काम न करण्याचा सल्ला दिला. 

त्याकाळात अशी माहिती समोर आली होती की काजोल आणि शाहरुखची केमिस्ट्री अजयला आवडत नव्हती त्यामुळे तो इन्सिक्योर झाला होता. त्यामुळे त्यानं काजोलला शाहरुखसोबत काम न करण्यास सांगितले होते. काजोल आणि अजय हे 1999 मध्ये लग्न बंधनात अडकले होते. लग्नापूर्वी दोघे बरिच वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. काजोल आणि अजयनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण प्रेक्षकांना तिची केमिस्ट्री ही शाहरुखसोबतच आवडली. masala.com नं दिलेल्या वृत्तानुसार, "प्रेक्षक काजोलआणि अजयच्या रिलेशनशिपविषयी कमी आणि काजोल आणि शाहरुखच्या मैत्रीविषयी जास्त बोलत होते. हे अजयला आवडलं नाही. तेव्हा त्यानं काजोलला शाहरुखसोत काम न करण्यास सांगितले."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, एका मुलाखतीत शाहरुख याविषयी बोलला होता. एका मुलाखतीत जेव्हा शाहरुखला या विषयी विचारण्यात आले की हे सत्य आहे का की अजयला काजोलचे त्याच्यासोबत काम करणे पसंत नाही आणि त्यानं त्यासाठी नकार दिला. यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला, "मला नाही माहित की अजयनं असं काही सांगितलं आहे. जर अजयनं नकार दिल्यामुळे काजोल माझ्यासोबत काम करणार नसेल तर तिच्या या निर्णयाचा आदर करेन. पण मला वाटत नाही की असं काही झालं आहे. हे थोडं विचित्र आहे. जर गौरी अभिनेत्री असती तर मी असं तिला कधीच म्हटलं नसतं की तू कोणासोबत काम करायला हवं आणि कोणासोबत नाही."

हेही वाचा : घटस्फोटांच्या चर्चांमध्ये 'या' दाक्षिणात्त्य अभिनेत्याने उचललं असं पाऊल? चाहत्यांमध्ये संभ्रम

काजोलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती नुकतीच 'लस्ट स्टोरी 2' या चित्रपटात दिसली. तर लवकरच ती ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ‘द गुड वाइफ’ या अमेरिकन सीरिजचा हा हिंदी रिमेक आहे.