किस करताना कंगनानं घेतला चावा आणि...? अभिनेता म्हणातो...
Vir Das on kissing scene with Kangana Ranaut : कंगना रणौतनं `रिवॉल्वर रानी` या चित्रपटात असलेल्या एका किसिंग सीन दरम्यान, वीर दासला जोरात चावलं की त्याच्या ओठातून रक्त येऊ लागलं होतं यावर आता अभिनेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे.
Vir Das on kissing scene with Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. कंगना रणौतनं काही दिवसांपूर्वीच तिच्या आणि अभिनेता वीर दासमध्ये असलेल्या किसिंग सीनविषयी सांगितलं होतं. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रिवॉल्वर रानी' या चित्रपटात त्यांच्यात एक किसिंग सीन होता. त्यात किस करत असताना सगळं इतकं इन्टेन्स झालं होतं की वीर दासच्या ओठांतून रक्त येऊ लागलं होतं. त्यामुळे कंगनानं तिची प्रतिक्रिया दिली होती. आता अभिनेता वीर दासनं यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनानं गेल्या महिन्यात तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीमध्ये तिनं तिच्या आणि वीर दासमध्ये असलेल्या किसिंग सीनवर वक्तव्य केलं होतं. त्यावर आता वीर दासनं प्रतिक्रिया दिली आहे. वीर दास म्हणाला, मला आश्चर्य या गोष्टीचं आहे की 10 वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला. ही 10 वर्षे जूनी पीआर स्टोरी होती. पण त्यावर आता का चर्चा का?
कंगनानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मस्करी करत म्हटले होते की हृतिक रोशननंतर मी वीर दासची इज्जत लूटली? हे कधी झाल? यावर उत्तर देत वीर दास म्हणाला, वृत्तपत्रात किंवा सोशल मीडियावर जे काही प्रकाशित होतं त्या बद्दल मला आश्चर्य वाटत नाही. मी त्या पंचसोबत खेळत राहतो. पण तो पुढे म्हणाले की ज्या प्रकारे कंगनानं त्या बातमीवर प्रतिक्रिया दिली मी देखील तशीच दिली असती. का आता आणि काय गरज आहे? त्यानंतर कंगनानं हसण्याचं इमोजी वापरलं. 2016 आणि 2017 मध्ये हृतिक रोशन आणि कंगना रणौतमध्ये खूप मोठा वाद झाला होता. इतकंच नाही तर त्या काळात ते दोघेही वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. तर दुसरीकडे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील सुरु होत्या. त्यावर हृतिकनं नेहमीच नकार दिलेला आहे.
हेही वाचा : एका गाण्यासाठी बिग बींना 3 महिने वेटिंगवर ठेवणारा दलेर मेहंदी सध्या आहे तरी कुठे?
कंगना आणि वीर दास असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर यांनी केले आहे. या चित्रपटात कंगना आणि वीर दास व्यतिरिक्त पियुष मिश्रा, झाकीर हुसेन आणि कुमुद मिश्रा यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची पटकथा ही तिच्या कथेएवती भोवती फिरते.