Kangana Ranaut on Melodi Video : इटलीची पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. पण नेहमीच त्या दोघांना घेऊन सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत असतात. मात्र, या सगळ्याचा नरेंद्र मोदी किंवा मग मेलोनी यांना फरक पडत नाही. शनिवारी मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक व्हिडीओ शेअर केला होता. तेव्हा पासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री कंगना रणौत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी हे हसताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करत मेलोनी यांनी कॅप्शन दिलं होतं की ''Hi friends from #Melodi....'. या व्हिडीओत ती बोलताना देखील दिसते. दोन देशाच्या राजकारण्यांमध्ये असलेले हे चांगले संबंध पाहता कंगना रणौतला देखील आनंद झाला. तिचा आनंद जाहिर करत कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला रिपोस्ट करत त्यांनी लिहिलं की 'मोदी जींच्या सगळ्यात चांगल्यां गुणांपैकी एक गुण म्हणजे ते महिलांना हे वाटून देतात की ते त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी आयुष्यात खूप प्रगती करावी असं त्यांना वाटतं. त्यामुळे यात कोणतीही आश्चर्याची गोष्ट नाही की पीएम मेलोनी यांना वाटतं की मोदी जी त्यांची टीम मेलोनीकडून आहेत.' दरम्यान, मेलोनी यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर फक्त 2 तासात 11 मिलियन व्ह्युज आहेत. 



या आधी शनिवारी इटलीला अपुलियामध्ये आयोजित करण्यात आलेलया जी-7 शिखर परिषदेसाठी दोघांनी सेल्फी क्लिक करून ती ऑनलाइन शेअर केली होती. यात ते दोघं फोटोत हसताना दिसले. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ही आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर गेले. ते शुक्रवारी एक दिवसीय इटली दौऱ्यावर गेले होते. तर त्यावेळी भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसले.



हेही वाचा : दाक्षिणात्य अभिनेत्याला अटक होताच मुलाची भावनिक पोस्ट, 'मला बोलून काही होणार नाही...'


ज्या ठिकाणी जी-7 शिखर परिषदे सुरु होती तिथे पोहोचताच पंतप्रधान मेलोनी यांनी नमस्ते करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. नरेंद्र मोदी ही इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या निमंत्रणानंतर G7 शिखर परिषदेचा भाग होण्यासाठी पोहोचले होते. त्यांनंतर त्यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिले की 'भारताला जी7 शिखर परिषदेचा भाग बनवण्यासाठी आमंत्रण देण्यासाठी आणि खूप चांगली व्यवस्था करण्यासाठी आभार.'