जगातील सर्वात मोठं रहस्य कैलास पर्वत! चढाई, स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणार जिना, आजपर्यंत मानवाला करता आली नाही चढाई

कैलास पर्वत हे अनेक रहस्य असेलले सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. कैलास पर्वत स्वर्ग हा आणि पृथ्वी दरम्यान एक जिना मानला जातो. 

Jun 26, 2024, 23:54 PM IST

Kailash Parvat Mystery :  माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. कैलास पर्वताची (Kailash Mountain) उंची माउंट एव्हरेस्टपेक्षा 2 हजार मीटर कमी आहे.  असे असताना माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम अनेकांनी रचला. मात्र,  आजवर कोणीही कोणीही कैलास पर्वतावर चढाई का करु शकले नाहीत? बौद्ध आणि हिंदूधर्मीय   कैलास पर्वता अति पवित्र का मानतात. जाणून घेवूया कैलास पर्वताची रहस्ये. 

1/7

अनेकांनी कैलास पर्वत सर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथे चढाई करताना नेव्हिगेशन करणे खूप अवघड होते. कारण दिशा भरकटते, रस्ता चुकतो. येथे असलेल्या अलौकिक शक्तीमुळे येथे दिशानिर्देश बदलत असल्याचा दावा येथे चढाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी केला आहे.

2/7

सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यास पूर्णपणे बंदी आहे. कारण भारत आणि तिबेटसह जगभरातील लोकांचा असा विश्वास आहे की हा पर्वत एक पवित्र स्थान आहे, म्हणून कोणालाही त्यावर चढू दिले जाऊ नये. बौद्ध भिक्षू योगी मिलारेपा 11 व्या शतकात कैलास पर्वतावर चढाई केली होती. पवित्र आणि रहस्यमय पर्वतावर भेट देऊन जिवंत परत येणारा तो जगातील पहिला माणूस होता असा दावाही केला जातो.    

3/7

कैलास पर्वत अत्यंत किरणोत्सर्गी आहे. पर्वताचा उतार 65 अंशांपेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्टवर हा उतार 40 ते 60 अंशांपर्यंतचा आहे. यामुळेच गिर्यारोहक देखील येथे चढण्यास घाबरतात. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे येथे हेलीकॉप्टर देखीव भरकटतात. कैलास पर्वत सर करताना चुकीच्या दिशेने वळणे आणि दिशाभूल करणाऱ्या पायवाटा लागतात.येथील हवामानात मानवाची प्रकृती बिघडते.      

4/7

 कैलाश पर्वत इतर पर्वतांप्रमाणे त्रिकोणी नसून तो चौकोनी आकाराचा आहे.  पुराणानुसार हा पर्वत सृष्टीचे केंद्र आहे. कैलास पर्वतावर  सोन्या, माणिक, स्फटिका आणि लॅपिस लाजुली अशा मौल्यवान धातूंचा साठा असल्याचा उल्लेखही पुराणात आढळतो.  

5/7

कैलाश पर्वत एक नैसर्गिक रचना नाही तर अलौकिक शक्तींमुळे तयार झालेला पिरॅमिड आहे. कैलाश पर्वत 100 रहस्यमय पिरॅमिड्सपासून बनलेला आहे असा दावा रशियन नेत्र रोग विशेषज्ञ अर्नेस्ट मुलादाशेव यांनी केला आहे.   

6/7

हिंदू, बौद्ध, जैन धर्मीयांमध्ये कैलास पर्वत अति पवित्र स्थान मानले जाते. हिंदूंच्या धार्मिक मान्यतानुसार कैलास पर्वत भगवान शिवचे घर आहे. येथे मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते. तिबेटी बौद्ध हे कैलास पर्वताला पृथ्वीवरील बौद्ध विश्वविज्ञानाचे केंद्रबुिंदु मानतात. जैन धर्माचे संस्थापक, ऋषभ यांना येथे आध्यात्मिक जागृति मिळाल्याचा दावा केला जातो. 

7/7

प्रसिद्ध कैलास पर्वत तिबेटच्या नैऋत्य कोपऱ्यात आहे.  बलाढ्य हिमालयाच्या कुशीत वसलेला आहे. भारतातून उत्तराखंडमार्गे कैसाल पर्वताच्या दिशेने जाता येते. आजपर्यंत एकाही मानवाने कैलसा पर्वत सर केलेला नाही. अगदी  रशिया आणि चीनसारख्या महाशक्तीशाली देशांनीही कैलास पर्वतासमोर पराभव स्वीकारला आहे.