समुद्र नाही तर नदीमुळे निर्माण झालेले महाराष्ट्रातील एकमेव बेट; कोकणाला टक्कर देणारं निसर्गसौंदर्य

समुद्र नाही तर नदीमुळे निर्माण झालेलं महाराष्ट्रातील हे बेट नेमकं आहे कुठे जाणून घेवूया.

| Jun 27, 2024, 00:15 AM IST

Ramling Bet, Bahe, Sangli : बेटं म्हंटल की डोळ्यासमोर दिसतो तो अथांग समुद्र. समुद्रात मध्यभागी असेलली अनेक लोकप्रिय बेट महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एक असं अनोख बेट आहे जे समुद्र नाही तर नदीमुळे निर्माण झालं आहे. या बेटाजवळील सुंदर परिसर पर्यटाकांना भुरळ घालत आहे. 

 

1/7

सांगली जिल्हयातील वाळवे तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेट पर्यटकांचे श्रध्दास्थान व पर्यटनस्थळ म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.  

2/7

येथील नदीत नौका विहार देखील केले जाते. 

3/7

सांगली जिल्ह्या बरोबरच महाराष्ट्रातून या बेटाला भेटी देण्यासाठी पर्यटकांची वर्दळ असते.

4/7

कृष्णा नदीला आलेले महापूर पाहून  श्री  रामांनी  पाणी दोन्ही बाहुनी थोपावले अशीही आख्यायिका आहे.

5/7

री  रामांनी स्नान करून तेथे शिवलिंग स्थापन केले. यामुळे हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. 

6/7

लंकेहून परत येताना प्रभू श्री रामचंद्र कृष्णा स्नानासाठी या ठिकाणी उतरले होते अशी अख्यायिका आहे. यामुळे रामभक्त मोठ्या संख्येने येथे येतात. 

7/7

इस्लामपुरापासून 13 किलोमीटर अंतरावर एन एच 4 हायवेवरील कासेगांव पासून सात किलोमीटर अंतरावर बहे गावा लगत कृष्णा नदीच्या पात्रात हे रामलिंग बेट आहे.