Actress Shobhitha Shivanna Found Dead : छोट्या पडद्यावरील कन्नडा अभिनेत्री शोभिता शिवन्नानं हैदराबादमध्ये राहत्या घरी मृतअवस्थेत सापडली. शोभिता ही गचीबोवली येथे असलेल्या श्रीराम नगर कॉलोनीमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. शेजारच्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिस तिथे पोहोचले आणि त्यांनी पाहिलं तर शोभितानं अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर त्यांनी लगेच शविच्छेदनासाठी करण्यासाठी शोभिताचं पार्थीव रुग्णालयात पाठवलं. दरम्यान, शोभितानं 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोभितानं गेल्या वर्षीच लग्न केलं होतं. लग्नानंतर ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर झाली आणि नवरा सुधीरसोबत हैदराबादमध्ये राहू लागली. शोभितानं कथितपणे आत्महत्या करण्याचं खरं कारण अजून समोर आलेलं नाही. गचीबोवली पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे आणि त्याशिवाय तिचं निधन कसं झालं या सगळ्याचा ते तपास करत आहेत. पोलिस तिच्या कुटुंबाचं, मित्रांचं आणि शेजारच्यांची जबाब नोंदवून घेत आहेत. शोभिताचं पार्थीव शरिर बंगळुरु घेऊन जाणार आहेत. तिथेच तिचे माहेरचे लोक राहतात. 



शोभिता सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय नव्हती. 1 नोव्हेंबर रोजी तिनं अखेरची पोस्ट कन्नड राज्योत्सव आणि दिवाळीच्यानिमित्तानं शेअर केली आहे. त्यात तिनं चाहत्यांकडून तिच्या आगामी चित्रपटासाठी पाठिंबा देण्यास देखील सांगितलं होतं. आता तिच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या सगळ्यात शोभितानं आत्महत्या का केली याचं काही सत्य समोर आलेलं नाही. इतकंच नाही तर नक्की काय असं कारण असेल की तिनं हा इतका मोठा आणि भयानक निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. 


हेही वाचा : नाना पाटेकरांनी बादशाहच्या रॅपची उडवली खिल्ली; हटके अंदाजात उत्तर देत रॅपर म्हणाला, 'तुम्ही ऐकलं असतं तर...'


शोभिता ही 30 वर्षांची होती. शोभिताच्या लोकप्रियते विषयी बोलायचं झालं तर शोभिता ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. शोभितानं ‘ब्रह्मगंटु’ आणि ‘निनिडेल’,‘गालीपता’, ‘मंगला गौरी’, ‘कोगिले’, ‘कृष्णा रुक्मिणी’ आणि ‘अम्मावरू’ सारख्या अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली होती. तिनं चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं. ‘एराडोंडला मूरू’ आणि ‘जॅकपॉट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली होती.