Karan Johar Confessess his love for Ranveer Singh: निर्माता करण जोहर हा सध्या आपल्या 'कॉफी विथ करण' या शोमुळे भलताच चर्चेत आहे. त्यातून एकीकडे रणवीर सिंग त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे अद्याप चर्चेतून बाजूला झालेला नाही. रणवीर सिंग आलिया भट्टसोबत 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सगळीकडे प्रेमाचे वारे वाहू लागले आहे मग त्यात बॉलीवूड कसे वगळले जाईल. सध्या या बॉलीवूडमध्येही प्रेमाचे गुलाबी वारे वाहू लागले आहेत. मात्र यावेळी प्रकरण जरा वेगळं आहे. चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगकडे आपले प्रेम व्यक्त केले आहे. 


त्याने इंस्टाग्रामवर रणवीरचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे आणि त्याखाली त्याने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. करणने लिहिले आहे की, ''हा कसलाही माझा वेगळा प्लॅन नाही तर ही माझी भावना आहे जी मी माझ्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मी रणवीर सिंगच्या प्रेमात पडलो आहे'', असे शब्द खुद्द करणने उद्गारले आहेत. रणवीर सिंग करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून दिसणार आहे.


करण जोहर पुढे लिहितो की, ''माझ्या चित्रपटादरम्यान मी त्याला (रणवीरला) खूप जवळून पाहिले आहे. तो गंभीर पण तितकाच भावनिक माणूस आहे. एक कलाकार म्हणून तो जरा वेगळा आहे परंतु त्याच्या आतंरिक सौंदर्यावर मी भारावून गेलो आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या मी प्रेमात आहे'', असं म्हणत करणने रणवीरवर आपले प्रेम असल्याचे कबूल केले आहे.



रणवीर सिंग त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सध्या चर्चेत आहे. त्याने गेल्याच महिन्यात एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली तर दुसरीकडे त्यांना पाठिंबाही मिळाला. त्यांना चित्रपटसृष्टीचा विशेष पाठिंबा मिळाला तसेच सहकारी कलाकारांनीही साथ दिली. हा पांठिबा मिळूनही मात्र त्याच्यावर मुबंईत गुन्हा दाखल करण्यात आला होता.