करीना कपूरचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह पण ओमायक्रॉनचा रिजल्ट...
करीना कपूर खान गेल्या १२ दिवसांपासून क्वारंटाईन आहे
मुंबई : करीना कपूर खान गेल्या १२ दिवसांपासून क्वारंटाईन आहे. पण आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्रीचा कोविड 19 रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यासह, कोविड 19 झाल्यानंतर, करीना कपूर खानची देखील ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली होती. ज्याचा रिपोर्ट आता आला असून चाहत्यांसाठी दिलासा देणारा आहे.
करिनाचा ओमायक्रॉन आणि कोविड 19 चा रिपोर्ट निगेटिव्ह
कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर, करीना कपूर खानची देखील ओमायक्रॉनच्या वाढत्या केसमुळे जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली होती. जेणेकरून अभिनेत्री ओमायक्रॉन जाळ्यात आली आहे की नाही हे कळेल. या चाचणीचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे. त्याचवेळी करिनाने सोशल मीडियावर देखील माहिती दिली की तिचा कोविड 19 रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला आहे.
अमृता अरोरा, महीप आणि सीमा खान यांचेही रिपोर्ट्स आले
करीना कपूर खान व्यतिरिक्त, अमृता अरोरा, सीमा खान आणि महीप कपूर यांचा ओमायक्रॉन रिपोरेटही निगेटिव्ह आला आहे.
'कभी खुशी कभी गम'ला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल करणने दिली होती पार्टी
'कभी खुशी कभी गम' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त करण जोहरने एका पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीत करीना व्यतिरिक्त अमृता, सीमा खान आणि महीप कपूर गेले होते. त्यानंतर या सर्वांना कोरोनाची लागण झाली.