मुंबई : बॉलिवूड  अभिनेत्री दीपिका पादुकोणची  (Deepika Padukone) एक्स मॅनेजर करिश्मा प्रकाशने (Karishma Prakash) क्वाम टॅलेंट कंपनीला (Kwan Talent Management Company) राजीनामा दिला आहे. आता करिश्मा आणि दीपिकाचा काहीही संबंध नाही.  करिश्माने क्वान कंपनीला राजीनामा दिल्याच्या अफवा पसरल्या होत्या. बुधवारी कंपनीच्या वरिष्ठांनी यासंबंधी एक अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सुब्रमण्यम यांनी संबंधीत खुलासा केला. करिश्मा प्रकाशने तातडीने २१ ऑक्टोबरला राजीनामा दिला होता, तो स्वीकारण्यात आला आहे. आता करिश्माचा दीपिका पादुकोण आणि कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांसोबत काही संबंध नसल्याचं सांगण्यात येत आहे. 


शिवाय करिश्माविधात सुरू असलेली चौकशी व्यक्तिगत स्वरूपाची आहे. त्यामुळे मीडिया हाऊस आणि पत्रकारांना विनंती करण्यात येते की याप्रकरणी बातम्या प्रसारित करताना या बाबींचा विचार करावा. असं क्वान कंपनीकडून सांगण्यात आहे. 


बॉलिवूड  ड्रग्स प्रकरणी करिश्माला दोन वेळा NCB समन्स पाठवण्यात आला. पहिल्यांदा  ऑक्टोबर महिन्यात एनसीबीने करिश्माला समन्स जारी केले होते. मात्र समन्स पाठवल्यानंतर ती चौकशीसाठी उपस्थित राहिली नाही. त्यामुळे तिला दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले. 


अखेर बुधवारी करिश्माची चौकशी झाली. NCBने तिची आई मिताक्षरा पुरोहित आणि क्वान टॅलेंट मॅनेजरकडे समन्स पाठवले. करिश्माने तिच्या आईचा पत्ता दिल्याने एनसीबीने करिश्माच्या आईला समन्स पाठविले. करिश्मा क्वान टॅलेंट कंपनीमध्ये काम करत होती.