Katrina Kaif's Mother in Law make Home Made Hair Oil: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची जोडी ही चांगलीच चर्चेत असते. विकी कौशलच्या आईचं आणि कतरिना कैफचं किती गोड नातं आहे याविषयी सगळ्यांना माहित आहे. त्यांच्यात असलेल्या बॉन्डची नेहमीच सगळीकडे चर्चा सुरु असते की कशा प्रकारे त्या सून कतरिना कैफला मुली प्रमाणे प्रेम करतात. कतरिनाला जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा ती सासूसोबत खूप वेळ व्यथित करते. त्या दोघी काही दिवसांपूर्वीच शिर्डीच्या मंदिरात गेल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिनावर तिची सासू वीना कौशल खूप प्रेम करतात आणि तितकेच लाडही करतात. इतकंच नाही तर त्या कतरिनाच्या केसांची मालिश करून देण्यासाठी एक खास तेल बनवतात. याचा खुलासा स्वत: कतरिना कैफनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. कतरिना कैफनं ही मुलाखत द वीकला दिली आहे. यावेळी तिच्या स्किनकेयरविषयी बोलताना म्हणाली, 'मला स्किनकेयर खूप आवडतं कारण माझी त्वचा ही खूप सेंसेटिव्ह आहे. मला गुआ शा ( त्वचेला चांगली ठेवण्यासाठी असलेली चायनीज टेकनीक) खूप आवडतं. मला हे माहित आहे की त्यासाठी खरं तर मी खूप उशिर केला आहे. मी आताच ते करण्याची सुरुवात केली आहे.'



पुढे हेअर केअर विषयी सांगताना कतरिना म्हणाली, 'माझी सासू माझ्यासाठी कांदा, आवळा, अ‍ॅव्होकाडो आणि त्यात आणखी दोन-तीन गोष्टी टाकून केसांना लावण्यासाठी तेल बनवते. त्याशिवाय घरगूती उपाय देखील खूप चांगल्या प्रकारे करतात.'


हेही वाचा : बराक ओबामा यांच्या Most Favorite Movie मध्ये 2024 चा 'हा' भारतीय चित्रपट; तुम्ही पाहिलात का?


दरम्यान, कतरिनाला तिचे सासू-सासरे किट्टो म्हणून हाक मारतात. कतरिना ही नेहमीत तिच्या सासू-सासऱ्यांचं कौतुक करताना दिसते. 2022 मध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये कतरिनानं सांगितलं होतं की सासू तिच्यासाठी रताळे बनवते. त्यासोबत तिच्या स्पेशल डायटवर देखील लक्ष ठेवते. त्याशिवाय कतरिनानं तिचा नवरा विकी कौशलची देखील अनेकदा स्तुती केली आहे. तिनं सांगितलं होतं की विकी हा खूप समजुतदार आणि सांभाळून घेणारा आहे. कतरिना आणि विकीनं काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 9 डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी लग्न केलं. दरम्यान, कतरिना अनेकदा तिच्या सासू-सासऱ्यांसोबत फोटो शेअर करताना दिसते.