बराक ओबामा यांच्या Most Favorite Movie मध्ये 2024 चा 'हा' भारतीय चित्रपट; तुम्ही पाहिलात का?

Barak Obama Favourite Movies 2024: बराक ओबामा यांनी शेअर केली 2024 च्या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांची यादी...  त्यात 'या' भारतीय चित्रपटानं मारली बाजी

दिक्षा पाटील | Updated: Dec 21, 2024, 04:28 PM IST
बराक ओबामा यांच्या Most Favorite Movie मध्ये 2024 चा 'हा' भारतीय चित्रपट; तुम्ही पाहिलात का? title=
(Photo Credit : Social Media)

Barak Obama Favourite Movies 2024: प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील अमेरिकिचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. यंदाच्या वर्षा त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांना कोणते चित्रपट आवडले त्याची यादी शेअर केली आहे. तर या यादीत आणखी एका भारतीय चित्रपटांचं नाव आहे. ज्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप स्तुती मिळाली. त्याशिवाय स्वत: बराक ओबामा यांनी देखील तो चित्रपट सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. 

बराक ओबामा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी यंदाच्या वर्षात त्यांना कोणते चित्रपट आवडले त्याची यादी शेअर केली आहे.  ही क्रिएटिव्ह पोस्ट शेअर करत बराक ओबामा यांनी लिहिलं की खाली काही चित्रपटांची नावं दिली आहेत, जे चित्रपट पाहण्याचा मला सल्ला देईन. यात शेअर केलेल्या फोटोला क्रिएटिव्ह करत त्यांनी लिहिलं की बराक ओबामाचे 2024 मधील सगळ्यात आवडते चित्रपट

1. ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट 
2. कॉन्क्लेव
3. द पियानो लेसन
4. द प्रॉमिस्ड लॅन्ड
5. द सीड ऑफ द स्केअर्ड फिह
6. ड्यून: पार्ट टू
7. एनोरा
8. दीदी
9. शुगरकेन
10. ए कम्पलिट अननोन

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट' या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहास रचला आहे. या चित्रपटानं सगळ्यांचं लक्ष तेव्हा वेधलं जेव्हा त्याला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रॅन्ड प्रिक्स पुरस्कार मिळाला. दरम्यान, कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 30 वर्षांमध्ये दाखवण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट आहे. गोल्डन ग्लोब्स आणि क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्ससाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. 

हेही वाचा : अमिताभ बच्चनवर भारी पडलेला 'हा' अभिनेता आज एका ब्रेकसाठी करतोय स्ट्रगल!

चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर 'ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट' ही कथा एक कंटाळलेली नर्स प्रभाची गोष्ट आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिला तिच्या नवऱ्याकडून एक गिफ्ट येतं. तर तिची रुममेट अनु ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत इंटिमसी एक्सप्लोअर करते. समुद्र किनाऱ्यावर सुरु असलेल्या या प्रवासामुळे त्यांना त्यांच्या इच्छा आणि भावना समजण्यास मदत होते. चित्रपटात कनी कुसरुति, दिव्या प्रभा आणि छाया कदम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.