Amitabh Bachchan Jaya Bachchan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे सध्या ‘कौन बनेगा करोडपति’ मध्ये स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसतात. एपिसोडमध्ये स्पर्धकांना ते काही ना काही सल्ला देताना दिसतात. त्यांनी नुकत्याच एका एपिसोडमध्ये म्हटलं की बायकोचं नेहमी ऐकायला हवं, असा सल्ला त्यांनी पत्नीला दिला आहे. ज्यावेळी अमिताभ यांनी स्पर्धकाला ही गोष्ट सांगितली तेव्हा तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हे हसताना दिसतात. नक्की बिग बी त्यांच्या पत्नीला घेऊन असं काय म्हणाले आणि त्यासाठी जया बच्चन या कारणीभूत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन नेहमीच शोमध्ये त्यांचं घर आणि जया बच्चन यांच्या संबंधीत अनेक जुन्या गोष्टींवर चर्चा करताना दिसतात. जया या त्यांच्या घरातील बॉस आहेत. हे त्यांच्या मुलांना आणि अमिताभ यांना देखील माहित आहे. त्या तिघांनी अनेकदा हे मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. केबीसीमध्ये अनेकदा ते लोकांसोबत ही गोष्ट शेअर करताना दिसतात. आता 'कौन बनेगा करोडपति 16' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये बिग बी एका कपलला सांगितात की नवऱ्यानं बायकोनं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी या ऐकायला हव्यात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा : KBC 16 मध्ये रिक्षाचालकाने जिंकले 12.5 ला; 25 लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, तुम्हाला जमेल का?


'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये हर्षित भूटानीला हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. दोघं नवरा-बायको एकमेकांना सल्युट करताना दिसतात. हर्षितला असं करताना पाहून अमिताभ बच्चन त्यांना विचारतात की हे काय आहे. त्यावर उत्तर देत त्यांनी सांगितलं की सर बऱ्याच काळापासून हॉट सीटवर येण्यासाठी प्रयत्न करत होतो. आता जाऊन माझं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. हर्षित आणि त्याची पत्नी दोघांमध्ये ही पैज होती की हॉटसीटपर्यंत दोघांपैकी कोण पोहोचेल. त्यानंतर त्यानं त्याच्या पत्नीला सांगितलं की तो पोहोचला. त्यामुळे त्यानं असं केलं. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली की त्यांनी हर्षितला शोसाठी ट्रेनिंग दिली होती. हे ऐकल्यावर बिग बींनी देखील हर्षितला हा सल्ला दिला ही नेहमीत बायको जे सांगते ते ऐकायचं तिच्यासमोर हार मानायची. दरम्यान, आता सगळीकडे  कौन बनेगा करोडपतीच्या या एपिसोडची चर्चा रंगली आहे.