Kaun Banega Crorepati 2024 : 'कौन बनेगा करोडपति 16' च्या लेटेस्ट एपिसोडनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हॉटसीटवर यावेळी मुजफ्फरनगरचे ई-रिक्षा ड्रायव्हर पारसमणि सिंग होते. त्यांनी यावेळी असा खेळ खेळला की अमिताभ बच्चन यांच्यापासून सगळ्यांनाच आश्चर्य झाले. पारसमणि सिंग यांनी त्यांना दिलेल्या लाइफलाइनचा वापर करत 25 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र, ते ही रक्कम जिंकण्यापासून हुकले. पारसमणि सिंग यांना 25 लाख रुपयांसाठी जो प्रश्न विचारण्यात आला होता त्याचं उत्तर ते देण्यास ते अपयशी ठरले. त्यांना यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंबंधीत हा प्रश्न विचारण्यात आला होता.
पारसमणि सिंग यांना KBC 16 मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर देत ते 12.5 लाख रुपयांची रक्कम जिंकली. त्यांनी कधी स्वप्नात विचार केला नव्हता की ते एका रात्रीत लखपती होतील. त्यांनी 12.5 लाख रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर पारसमणि 25 लाख रुपयांच्या प्रश्नावर पोहोचले. त्यांना यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकत नव्हते त्यामुळे त्यांनी खेळ तिथेच संपवण्याचा निर्णय घेतला.
अमिताभ यांनी पारसमणि सिंग यांना 25 लाख रुपयांसाठी जो प्रश्न विचारण्यात आला.
असा कोणता लेखक आहे जो कधी महात्मा गांधी यांना भेटला नाही तरी देखील त्यांच्यावर पुस्तक लिहिलं? त्यासाठी ऑप्शन खालील प्रमाणे होते.
ए) इवान बुनिन
बी) जॉर्ज ऑरवेल
सी) थॉमस मान
डी) रोमेन रोलांड
या प्रश्नाचं उत्तर पारसमणि सिंग यांना माहित नसल्यानं त्यांनी Video Call A Friend या लाइफलाइनचा वापर केला. पण त्यांना योग्य उत्तर मिळालं नाही त्यामुळे त्यांनी हॉटसीट सोडण्याचा निर्णय घेतला. पण हॉटसीट सोडण्यााधी पारसमणि यांना एक ऑप्शन निवडण्यास सांगितलं. तर पारसमणि सिंग यावेळी ऑप्शन सी) थॉमस मान ची निवड करतात. पण त्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन डी) रोमेन रोलांड होतं.
हेही वाचा : लग्नाआधी नवऱ्याचं वजन वाढलं म्हणून वर्षा उसगावकर यांनी...; तेव्हा जे घडलं ते अनपेक्षितच
दरम्यान, पारसमणि यांनी 'दैनिक भास्कर' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ई-रिक्शा चालवत त्यांनी कसे-बसे दिवस काढले. गेल्या 30 वर्षांपासून ते त्यांचं स्वत: घर खरेदी करण्याचा प्रयत्न करत होते. पण आर्थिक अडचणींमुळे ते शक्य झालं नाही. पारसमणि यांनी सांगितलं की दुकान बंद झालं आणि कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी ई-रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते रोज 400-500 रुपये कमावतात. पारसमणि गेल्या 10 वर्षांपासून KBC मध्ये जाण्याचं स्वप्न पाहत होते. ते ऑनर्स ग्रॅज्युएट आहेत.