'कौन बनेगा करोडपती'मध्ये (Kaun Banega Crorepati) नुकतीच गायक सोनू निगम (Sonu Nigam) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांनी हजेरी लावली. सोनू निगम आणि श्रेया घोषाल 'स्मित फाऊंडेशन'ला मदत करण्यासाठी खेळत होते. हे एक वृद्धाश्रम आहे, जो कुटुंबीय सांभाळ कऱत नसलेल्या वयस्कर आजी-आजोबांची काळजी घेतात. या संस्थेबद्दल बोलताना सोनू निगमने एका वयस्कर महिलेबद्दल सांगितलं जिला तिचा मुलगा मारहाण करत असे. सोनू निगमने जेव्हा घडलेला प्रकार सांगितला तेव्हा उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनू निगमने वयस्कर महिलेसोबत काय झालं सांगितलं तेव्हा श्रेया घोषालला अश्रू अनावर झाले होते. तसंच अमिताभ बच्चनदेखी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सोनू निगमने सांगितलं की, "एक लेखक आपल्या वयस्कर आईला घेऊन मुंबईत आला होता. वय जास्त असल्याने महिला वॉशरुमला जाताना आणि पाण्यासाठी उठताना थोडा आवाज करत असे. त्यामुळे तो लेखक तिला प्रचंड मारहाण करत असे". 


याबद्दल समजलं तेव्हा Smit Old Age Home and Care Foundation च्या संस्थापिका योदना घऱत त्यांना आपल्यासह घेऊन गेल्या आणि 6 महिने त्यांची सेवा केला. पण सहा महिन्यानंतर त्या लेखकाला आईची आठवण येऊ लागली. यानंतर तो त्यांना पुन्हा घरी घेऊन गेला असं सोनू निगमने सांगितलं. 


पण काही दिवसांनी जेव्हा योजना त्या महिलेला भेटायला गेल्या, तेव्हा त्या कोमात होत्या. त्या लेखकाने आपल्या आईला इतक्या वाईट पद्धतीने मारलं की, तिचा मृत्य झाला. कोणी आपल्या आईवर कसा काय हात उचलू शकतो? असा संताप यावेळो सोनू निगमने व्यक्त केला. 


सोनू निगमने हा सगळा घटनाक्रम सांगितल्यानंतर वयस्कर लोकांचा होणारा हा छळ पाहून श्रेया घोषालसह उपस्थितांचे डोळे पाणावले. यानंतर अमिताभ बच्चन, सोनू निगम, श्रेया घोषाल यांच्यासह उपस्थितांनी उभं राहून टाळ्या वाजत स्वयंसेवी संस्थेच्या कामाचं कौतुक केलं.