मुंबई : श्रीदेवीच्या निधनानंतर कपूर कुटूंबातील व्यक्तींचे कौटुंबिक नातेसंबंधांच्या बातम्या समोर येत आहेत. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर या कुटूंबातील असाच एक चेहरा समोर आलाय. हा चेहरा म्हणजे श्रीदेवीची जाऊबाई आणि अनिल कपूरची पत्नी सुनिता बंबानी. अनिल कपूरच्या स्ट्रगलिंग काळात संपूर्ण खर्च तिने उचलल्याचे बोलले जाते. सुनिता ही यशस्वी मॉडेल राहिली आहे.


अनिल कूपरकडे नव्हते पैसे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनिताशी सुत जुळविण्यासाठी अनिल कपूरने हरएक प्रयत्न केले. तिच्याशी फोनवर तर बोलत होता, पण प्रत्यक्ष भेटायचं धाडस मात्र करत नव्हता, त्याचं कारण होतं पैसे, त्यावेळी अनिल कपूरकडे पैसे नसल्यानं तिला डेटला घेऊन जायला अनिल कपूर टाळत होता. 


त्यानंतर सुनिता बंबानीनंच अनिल कपूरला भेटायला बोलावलं, तेव्हा मी २ तासांमध्ये पोहोचिन असं उत्तर दिलं. पण २ तास का लागतिल असं सुनितानं विचारलं असता मी बसनं येईन कारण कॅबनं यायला माझ्याकडे पैसे नसल्याचं अनिलनं सुनिताला सांगितलं. 


अनिलचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर सुनितानंही आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली, तु कॅब करुन ये, मी तुला पैसे देईन, असं सुनिता अनिलला म्हणाली. त्यानंतर अनेक वेळा सुनितानं अनिलला भेटण्यासाठी पैसेही दिले.


मित्रांनी दिला लग्न न करण्याचा सल्ला


हळू हळू अनिल कपूर बॉलीवूडमध्ये स्थिरावत होता, 1984 मध्ये आलेल्या मशाल या चित्रपटानं मग अनिल कपूरला ओळख मिळवून दिली.  या चित्रपटाच्या यशानंतर अनिलनं सुनिताला प्रपोज केलं, आणि सुनितानंही त्याला होकार दिला.


सुनिताच्या होकारानंतर बॉलीवूड चित्रपटांसारखचं ट्विस्ट या दोघांच्या आयुष्यात आलं.


पहिल्याच चित्रपटानंतर अनिलनं लग्न केलं तर त्याची कारकिर्द गोत्यात येईल, असे सल्ले त्याला देण्यात आले, त्यामुळे लग्नाची ठरलेली तारिख त्यानं पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.


त्याच्या या निर्णयामुळे सुनिताही असुरक्षित होत होती.


मग केव्हा झालं अनिल कपूरचं लग्न ?


यानंतर शांत डोक्यानं विचार केल्यानंतर अखेर 19 मे 1984 या दिवशी दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर सुनिता संसार सांभाळायला लागली, एवढच काय तर अनिल कपूरसाठी तिनं मॉडेलिंगही सोडलं आणि घर सांभाळलं.


अनेक वेळा अनिल कपूरचं नाव माधुरी दीक्षितसोबतही जोडलं गेलं, पण सुनितानं याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं, आणि अनिल कपूरला प्रत्येक वेळी साथ दिली.