Bobby Deol: बॉबी देओल आणि सनी देओल हे नुकतेच 'कॉफी विथ करण'च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. यावेळी त्यांनी अनेक वैयक्तिक गोष्टींवर खुलासा केला आहे. त्यातून बॉबी देओलनं आपल्या करिअरवरूनही अनेक खुलासे केले आहेत. बॉबी देओलनं 90 च्या काळात अनेक लोकप्रिय सिनेमे केले आहेत. परंतु त्यानंतर तो अनेक वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर होता. त्यामुळे बॉबी देओल चित्रपटसृष्टीपासून कायमचा दूर गेला आहे का याचीही जोरात चर्चा होती. त्यानंतर ओटीटीचे माध्यम आले आणि मग आश्रम या सिरिजमधून त्यानं कमबॅक केले ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. अल्पावधीतच या वेबमालिकेनं फार मोठी लोकप्रियता मिळवली होती. सध्या 'कॉफी विथ करण'मधून यावेळी त्यावरती खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी करण जोहरशी बोलताना त्यानं याचा खुलासा केला आहे. त्यानं सांगितले की आपल्याला एका वेळेला कोणतेच काम मिळत नव्हते. मी घरात बसून होतो आणि माझी बायको ही कामावर जायची. तेव्हा अशाच एका वेळेला त्याच्या मुलानं त्याला असा प्रश्न केला की ते घरी बसून का असतात. तो क्षण त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट होता. बॉबी देओल म्हणाला की, ''मी हार मानली होती. मला माझ्यावरच दया होत होती. मी घरी बसून फक्त दारू-पाणी यावरच विचार करत होतो. मी लोकांना सारखं विचारत बसायचो की तुम्ही मला चित्रपटातून का घेत नाही. मी हाही विचार करायचो की मला हे लोकं कामं का देत नाहीयेत. मला तेव्हा खूप नकारात्मक वाटत होतं. मी घरीच बसून होतो तेव्हा माझी पत्नी कामावर जात होती.''


हेही वाचा : ...म्हणून माझी पत्नी प्रसिद्धीपासून दूर; 'कॉफी विथ करण'मध्ये सनी देओलचा खुलासा


''अचानक एक दिवस माझा मुलगा माझ्याकडे आला आणि त्यानं सांगितले की आई तूला माहितीये का की पापा घरीच बसून असतात आणि तू कामावर जातेस. त्याच्या या बोलण्यानं माझं खूपच वाईट वाटले होते. मी फक्त हेच म्हणालो की, नाही मी नाही करू शकतं. मी हळूहळू त्यातून बाहेर आलो. मला यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागला परंतु शेवटी मी एक रात्री म्हणालो की मी हे नाही करू शकत'', असंही तो पुढे म्हणाला. 


त्यापुढे तो म्हणाला की, ''माझा भाऊ, आई आणि बहिण सर्वच जण माझ्या सपोर्टमध्ये होते. तुम्ही कायमच कुणाचा तरी हात पकडून काही करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या मेहनतीवर काहीतरी करणं हे अत्यंत बंधनकारक आहे. त्यानंतर गोष्टी या फार बदलतात. मी त्यानंतर जास्त फोकस आणि जास्त गंभीर झालो होतो. जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय सिद्ध करता तेव्हा तुमच्यात एक उर्जा संचारते. तेव्हा मी खूप लोकांना भेटलो आणि त्यांच्याकडे कामाबद्दल विचारणा केली होती. तेव्हा मी त्यांना सरळ सांगितलं की मला तुमच्यासोबत काम करायचे आहे तुम्हीही माझ्यासोबत काम केलेले नाही.'' असंही तो म्हणाला.