...म्हणून माझी पत्नी प्रसिद्धीपासून दूर; 'कॉफी विथ करण'मध्ये सनी देओलचा खुलासा

Sunny Deol Koffee with Karan: सनी देओल आणि बॉबी देओल याची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे. 'कॉफी विथ करण'च्या आठव्या पर्वातल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये करण देओल आणि बॉबी देओल यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 1, 2023, 02:25 PM IST
...म्हणून माझी पत्नी प्रसिद्धीपासून दूर; 'कॉफी विथ करण'मध्ये सनी देओलचा खुलासा title=
koffee with karan why wife pooja deol is away from limelight sunny deol explains

Sunny Deol Koffee with Karan: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल याची. आता कॉफी विथ करणचे नवे पर्व हे सुरू झाले आहे. त्यामुळे सध्या या पर्वाची सर्वत्र जोरात चर्चा आहे. पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंगनं हजेरी लावली होती. त्यांनी या एपिसोडमधून आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खुलासे केले होते. त्यानंतर आता या सिझनच्या दुसऱ्या एपिसोडमधून सनी देओल आणि बॉबी देओल या सख्ख्या भावांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी देओल आणि बॉबी देओल हे गेली 30 हून अधिक वर्षे बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. यावर्षी गदर 2 मुळे सनी देओलच्या करिअरला एक नव संजीवनी मिळाली आहे. त्यातून बॉबी देओलची आश्रम ही वेबसिरिज हीट झाल्यानंतर आता त्याचा Animal हा नवा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 

त्यामुळे सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे सनी आणि बॉबी देओलची. नुकतेच या सिझनच्या नव्या एपिसोडमध्ये ते दोघं हजर झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यावरती खुलासा केला आहे. सनी देओलनं आपली पत्नी लाईमलाईटपासून दूर का आहे याबद्दलचा एक खुलासा केला आहे. हल्ली आपण अगदी सहज पाहतो की सुपरस्टार्सच्या पत्नी या अभिनयात सक्रिय नसूनही त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. परंतु सनी देओल यांची पत्नी पूजा देओल मात्र प्रसिद्धीपासून फारच लांब आहेत. यामागील कारण अभिनेता सनी देओलनं सांगितलं आहे.

यावेळी तो म्हणाला की, ''वैयक्तिक पातळीवर आम्ही सगळेच असे आहोत. आम्ही खूप प्रायव्हेट आहोत. असं नाही की फक्त पूजाच आहे. मी संपुर्ण दिवस काम केल्यानंतर असा जागी जाणं पसंत करेन जिथे मला फार चांगली शांतता मिळेल. कारण जेव्हा तुम्ही इथे तिथे जाता तेव्हा सगळे तुमच्याकडे टक लावून पाहत असतात. तेव्हा अशावेळी मला जशी संधी मिळते तसा मी परदेशात जातो कारण तिथं कुणी त्रास देत नाही.'' 

हेही वाचा : केबीसीमध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना पाहून अमिताभ बच्चन सीटवरून उठले अन्...

मीडिया रिपोर्टनूसार, सनी आणि पूजा यांनी 1984 साली गूपचूप लग्न केले. पूजा या लेखिका आहेत. त्यांना राजवीर आणि करण देओल अशी दोन मुलं आहेत. पूजा या अभिनेत्री नाहीत. परंतु 'हिम्मत' या चित्रपटातून त्यांनी एक कॉमिओ रोल केला होता. त्यानंतर त्यांनी कधी कुठल्याचा चित्रपटातून कामं केली नाहीत. परंतु त्यांनी 'यमला पगला दीवाना 2' या चित्रपटाची कथा लिहिली होती. सनी देओळ आता लवकरच रणबीर कपूरसोबत 'रामायण' चित्रपटातून हनुमानाच्या भुमिकेतून दिसणार असल्याची चर्चा आहे.