`सत्यम शिवम सुंदरम` पुन्हा आला तर हिरोईन कोण असेल? झीनत अमान यांनी घेतलं `या` अभिनेत्रीचं नाव
Zeenat Aman On Satyam Shivam Sundaram 2 : `तुमच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल`, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावरही झीनत अमान यांनी उत्तर दिले.
Zeenat Aman On Satyam Shivam Sundaram 2 : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून करण जोहरला ओळखले जाते. करण जोहर हा त्याच्या चित्रपटासोबतच एका चॅट शो मुळेही चर्चेत असतो. करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमाचे आठवे पर्व सुरु आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. आता नुकतंच या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान आणि नीतू सिंह सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सिनसृष्टीसह खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.
करण जोहरचा बहुचर्चित कॉफी विथ करण 8 या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान आणि नीतू सिंह यांना त्यांचे करिअर आणि खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी झीनत अमान यांना त्यांच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलखुलासपणे उत्तर दिले. "तुमच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल", असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावेळी झीनत अमान यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव घेतले.
आणखी वाचा : 'तुला अजून चांगली भेटली असती...', पत्नीबद्दलची 'ती' कमेंट वाचताच सिद्धार्थ चांदेकर भडकला; म्हणाला- 'एखाद्या मुलीची गरज...'
त्यानंतर करण जोहरने त्यांना 'सत्यम शिवम सुंदरम' या बहुचर्चित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल विचारले. "जर सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटाच्या दुसरा भाग निर्मिती करण्यात आली, तर त्या चित्रपटात रुपाच्या भूमिकेसाठी आजच्या काळातील कोणती अभिनेत्री योग्य ठरेल?" असा प्रश्न झीनत अमान यांना विचारला. त्यावर झीनत यांनी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव घेतले. "दीपिका पदुकोणने सत्यम शिवम सुंदरम 2 या चित्रपटात रुपा हे पात्र साकारावं", अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान 'सत्यम शिवम सुंदरम' हा चित्रपट 22 मार्च 1978 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती राज कपूर यांनी केली होते. या चित्रपटात झीनत अमान आणि शशी कपूर हे प्रमुख भूमिकेत झळकले होते. झीनत यांनी या चित्रपटातील गावातील एका मुलीचे पात्र साकारले होते. या चित्रपटात त्यांनी अनेक बोल्ड सीन्सही दिले होते. त्यामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने त्याकाळात 4.5 कोटींची कमाई केली होती. झीनत अमान या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी इन्स्टाग्रामवर पदार्पण केले. त्यांचे इन्स्टाग्रामवर 584 हजार फॉलोअर्स आहेत.