साडी की टेबल क्लॉथ? Kriti Sanon ला पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
क्रिती सेननचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रिती ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. क्रिती ही तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अलीकडेच क्रितीनं अभिनेता आयुष्मान खुरानाच्या घरी असलेल्या प्री दिवाळी प्रार्टीला पोहोचली होती. या पार्टीत सर्व बॉलिवूड स्टार्स हजेरी लावणार आहेत.
हेही वाचा : आलिया भट्ट पाळणार कपूर कुटुंबाची प्रथा? बाळाच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीला रामराम?
क्रितीचा पार्टीतला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. क्रितीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत क्रितीनं पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची साडी नेसल्याचे दिसत आहे. क्रिती या साडीत सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर क्रिती सेननच्या लूकची सर्वाधिक चर्चा सुरु आहे. तर क्रितीनं ट्यूब ब्लाउजसह साडी परिधान केली आहे.
हेही वाचा : Akshay Kumar कडे 260 कोटींचं प्रायव्हेट जेट? अभिनेत्याचा मोठा खुलासा
या काळात क्रितीनं ब्लाउज परिधान केलं की नाही असा सवाल अनेकांनी उभा केला आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत क्रितीनं साडी नेसली नाही तर टेबल क्लॉथ परिधान केला आहे असं म्हटलं आहे. तर काही नेटकरी क्रितीला ट्रोल करत म्हणाले की ब्लाऊज घरी विसरलीस का? (kriti sanon spotted in white saree bold look but got trolled over saree blouse or table clothe)
हेही वाचा : 'मेरा कॅरेक्टर ढीला था, मैं लड़कियों के साथ...' ; गौहर खानसोबत साखपुडा मोडण्यावर साजिद खानचं वक्तव्य चर्चेत
क्रितीनं इंडस्ट्रीत 8 वर्षे पूर्ण केली आहेत. आज ती बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, क्रितीनं हे सिद्ध केले की ती फिल्मी करिअरमध्ये हिट आहे. अलीकडेच 'मिमी' चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी क्रितीचे कौतुक करण्यात आले. तिला आयफा आणि फिल्मफेअर सारख्या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते.