`कुंडली भाग्य` फेम अभिनेत्री लेस्बियन? मुलींबाबत जे काही म्हणालीये ते एकदा ऐकाच...
Kundali Bhagya Fame Actress Anjum Fakih : `कुंडली भाग्य` फेम अभिनेत्री सध्या खतरो के खिलाडी या मालिकेत दिसत आहे. या अभिनेत्रीचा तिच्या सह-कलाकार अभिनेत्रीसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर ती लेस्बियन असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
Kundali Bhagya Fame Actress Anjum Fakih : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंजुम फकीह सध्या 'खतरो के खिलाडी 13' साठी दक्षिण आफ्रिकेत गेली आहे. अंजुम तिथून अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिथे अंजुम खूप मज्जा करताना दिसत आहे. पण तुम्हाला माहित आहे का ती तिच्याविषयी अनेक अफवा सुरु आहेत. त्यातील एका अफवेवर अंजुमनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती लेसबियन असून तिला महिलांमध्ये इंटरेस्ट आहे या चर्चांवर वक्तव्य केलं आहे.
या डिजिटल पोर्टला दिलेल्या मुलाखतीत अंजुम म्हणाली, लोकांना वाटतं की मला महिलांमध्ये इन्ट्रेस्ट आहे. लोक काय बोलतात हे मला कळल्यानंतर आनंद झाला. पण ती कशी नाही. फक्त हे सांगायचे आहे. खरं सांगायचं झालं तर अंजुम आणि कुंडली भाग्य या मालिकेतील तिची सह-कलाकार श्रद्धा आर्या या दोघांचे असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते जे पाहून अनेकांनी ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले. खरं तर या दोघी कुंडली भाग्य या मालिकेत बहिणींच्या भूमिकेत आहेत.
सगळ्यात आधी अंजुम आणि श्रद्धाचा जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत श्रद्धानं अंजुमच्या ब्रेस्टवर हाथ ठेवला होता. त्यानंतर त्याच्यात असलेलं नातं नक्की काय असे सवाल अनेक लोक करु लागले होते. अनेकांनी तर अंजुम लेस्बियन आहे असे म्हटले तर यावर देखील अंजुम म्हणाली, मी माझ्या गर्लफ्रेंड्सच्या खूप क्लोज आहे. कधी कधी त्याच्या गालाच्या जागी ओठांवर किस करते. तो माझा स्वभाव आहे आणि लोकांना वाटतं की मला मुली आवडतात. असं काही नाही. मी माझ्या सगळ्या गर्लफ्रेंड्स म्हणजेच मैत्रिणींवर प्रेम करते. इतकंच काय तर ती कधीच कोणत्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये नव्हती असं तिनं सांगितलं आहे.
हेही वाचा : 'या' मालिकेत दाखवला मॅरिटल रेप? चाहत्यांचा संताप अनावर
अंजुम सगळ्यात शेवटी कुंडली भाग्य या मालिकेत दिसली होती. त्यानंतर आता तिला 'खतरो के खिलाडी 13' या कार्यक्रमात पाहणार आहोत. त्याच्या शूटिंगसाठी अंजुम खतरो के खिलाडीच्या संपूर्ण टीमसोबत दक्षिण आफ्रिकेला गेली आहे. इतकंच काय तर अंजुमला तिच्या घरच्यांनी तिला कधी पाठिंबा दिला नाही म्हणून तिनं खूप संघर्ष केल्याचं तिनं सांगितलं. तिला तिच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळाल्यानंतर ईटाइम्सला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिनं हे सगळं सांगितलं होतं.