न्यूयॉर्क :  अमेरिकेतमध्ये लिओनार्डो दा विंची ने तयार केलेल्या येशू ख्रिस्ताच्या शतकातील पेंटिंगच्या विक्रीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पेंटीगसाठी ४५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा जवळपास 3 हजार कोटी रुपयांची बोली लागली. त्यामुळे ही पेंटीग जगातील सर्वात महागडी पेंटीग ठरली आहे. 


१९ मिनिटांच्या या लिलाव प्रक्रियेत पेंटीग खरेदीकर्त्यांनी टेलिफोनवर बोली लावली. त्यामूळे महागड्या किंमतीत पेंटीग घेणाऱ्याचे नाव अजूनही समोर आले नाही.


ही पेंटींग 'साल्वातोर मुंडी' नावाने ओळखली जाते. 


 हा रेकॉर्डही तुटला


 २०१५ मध्ये पिकासोच्या पेंटीगचा लिलाव  $ १७.९४ कोटी डॉलर्समध्ये करण्यात आला होता. त्यामूळे लिओनार्डो दा विंचीने पिकासोच्या या पेंटीगचा रेकॉर्डही तोडला आहे. विमिन ऑफ एल्जियर्स म्हणून ओळखले जाते. 


असा पेंटीगचा प्रवास


 १७.९४ कोटी डॉलरमध्ये या पेंटीगचा लिलाव झाला होता. ही पेंटीग गहाळ झाली होती. पण ५०० वर्षांपूर्वी फ्रांसच्या शाही परिवाराला या पेंटीगचा अधिकार मिळाला. 
एवढेच नव्हे तर १९५० मध्ये ही केवळ ४५ पाउंड म्हणजेच ३९०० रुपयांत विकले गेले होते.


खरेदी विक्री सुरूच 


२००५  मध्ये पुन्हा १० हजार डॉलर्समध्ये याचा लिलाव करण्यात आला. यानंतरही एका रशियन अब्जाधीशाने $ १२.७५ कोटी डॉलर्समध्ये याची खरेदी केली होती. आता या पेंटिंगला ख्रिस्ती नामक संस्थेने ४५ कोटी डॉलर्सला विकले आहे.


काय येईल एवढ्या किंमतीत ?


३ हजार कोटी रुपयांमध्ये विकल्या गेलेल्या लिओनार्दोच्या पेंटीगने नवे रेकॉर्ड केले आहेत. एवढ्या मोठ्या रक्कमेच्या किंमतीत एखादे विमान खरेदी केले जाऊ शकते. तसेच ही किंमत 'एअरबस ए ३८०-८००' च्या किंमतीपेक्षाही अधिक आहे.


 पॅरिस सेंट फुटबॉल क्लबने या वर्षी टॉप खेळाडू नेमारसाठी २६.१  मिलियन डॉलरची बोली लावली होती.  कोलंबियामध्ये ९ नोव्हेंबरला १२ हजार किलो कोकेन जप्त करण्यात आले होते. ज्याची किंमत ३६ हजार कोटी डॉलर होती.
 
 तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने १२ लाख रोहिंग्या मुस्लिमांच्या मदतीसाठी ४३.४ कोटी डॉलर्सची मागणी केली होती.