पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती सुष्मिता सेन? या कारणामुळे ब्रेकअप
बॉलिवूड आणि क्रिकेटमध्ये नेहमीच एक विशेष जोड असते.
मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटमध्ये नेहमीच एक विशेष जोड असते. बऱ्याच क्रिकेटर्सनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केलं आहे. यामध्ये, विराट-अनुष्का, हरभजन सिंग-गीता बसरा असे अनेक कपल्स आहेत. पण असेही अनेक क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सेलेब्स आहेत ज्यांची लव्हस्टोरी अधूरी राहिली. आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत. ती गोष्ट आहे मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमची.
डान्स रिअॅलिटी शो दरम्यान सुष्मिता सेन आणि वसीम अक्रम यांची भेट झाली. दोघेही शोच्या सेटवर भेटले आणि दोघेही चांगले मित्र बनले. शो दरम्यान दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. मात्र, या आधीच वसीमचं लग्न झालेलं होतं. त्यामुळे या दोघांचं नातं पुढे जावू शकलं नाही.
वृत्तानुसार, २००९मध्ये या दोघांच्या लग्नानंतर सुष्मिता सेन आणि वसीम दोघंही जवळ आले होते आणि लग्न करण्याचा विचार करत होते. दोघांना बर्याच ठिकाणी स्पॉटही करण्यात आलं होतं पण दोघांनीही आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलणं टाळलं.
जेलसीमुळे तुटलं नातं
एका वृत्तानुसार वसीम अक्रमच्या जेलसीमुळे या नात्यात फूट पडली. सुष्मिताची ग्लॅमरस जीवनशैली आणि बिझी शेड्यूलमुळे वसीमला असुरक्षित वाटायचं. या कारणांमुळे वसिमने त्यांच्या नात्याला घेवून पुन्हा विचार करायला सुरुवात केली होती.
रिलेशनशिपबद्दल सुष्मिता म्हणाली अफवा
सुष्मिता सेन आणि वसीम कधीही त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलले नव्हते. एका मुलाखतीमध्ये सुष्मिता म्हणाली की, मला वसीम खूप आवडतो, पण याचा अर्थ असा नाही की, त्याच्यासोबत मी रिलेशनशिपमध्ये आहे.
रिलेशनशिपमध्ये येणं ही एक मोठी गोष्ट आहे. ज्यादिवशी मी रिलेशनशिपमध्ये येईन. त्यादिवशी, मी या बद्दल सगळ्यांना सांगेन. लोकांना चर्चा करण्याची संधी देणार नाही.
रिलेशनशिपच्या बातम्यांवर वसीमची प्रतिक्रिया
दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रमने म्हटलं होतं की, या अफवांमुळे मी अस्वस्थ झालो आहे. मी आयपीएलमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मला दोन्ही मुलांना वेळ द्यायचा आहे. यावेळी, मी माझा सगळा वेळ माझ्या मुलांसोबत घालवणार आहे. दुसऱ्यांदा लग्न करण्याचा असा माझा काहीच प्लान नाही आहे.