मुंबई : सलमान खान त्याच्या प्रोडक्शनखाली 'लवरात्री' या सिनेमातून मेव्हणा आयुष शर्माला लॉन्च करत आहे. आयुष शर्मा आणि वरिना हुसेन या फ्रेश जोडीचं लवरात्रीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे.  


भव्य ट्रेलर सोहळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष शर्माला लॉन्च करण्यासाठी सलमान खान त्याच्या स्टारडमचा पूर्ण ताकदीनिशी वापर करत आहे. ट्रेलर लॉन्चला खान कुटुंबीय उपस्थित होते. आयुष सोबत पत्नी अर्पिता आणि मुलगा अहिलदेखील उपस्थित होता. अहिल हा सोहळा एन्जॉय करताना मज्ज मस्ती करत होता. त्यामुळे अनेकांचं लक्ष अहिलवर खिळलं होतं. 


अहिलला पाहून सलमानने मस्करीत वडिलांआधी मुलगा लॉन्च होताना पाहून कसं वाटतयं? असा प्रश्न विचारला. थोड्या वेळाने अहिलच्या मस्तीचा मीडीयाशी बोलताना त्रास होतोय हे लक्षात येता सलमानने स्टेजवरूनच त्याच्या खास शैलीत शांत बसायला सांगितले. 


 



लवरात्रीचा ट्रेलर लॉन्च  


लवरात्रीमध्ये आयुष शर्मा सोबत वरिना हसिन ही अभिनेत्री झळकणार आहे. नवरात्रीच्या दिवसात जमलेली लव्हस्टोरी, रंगबेरंगी वातावरण आणि गरब्याचा ठेका याची झलक ट्रेलरमध्ये उत्तम जमली आहे. 'लवरात्री'चा कलरफूल ट्रेलर, आयुष शर्माचंं बॉलिवूडमध्ये पदार्पण