Lucky Ali On Bollywood: हिंदी कलाविश्वामध्ये एक काळ गाजवणारा गायक म्हणजे लकी अली. 19 सप्टेंबर रोजी 65 वा वाढदिवस साजरा केलेल्या या गायकाची प्रेक्षकांवर आजही कमाल भुरळ आहे. पण, ज्या काळात लकी अलीला प्रसिद्धी मिळाली त्याच काळातील इतर गायकांच्या तुलनेच मात्र तो फार काळ या सिनेजगतामध्ये तग धरु शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतासारख्या, चित्रपट संगीताला अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या देशात कारकिर्दीनं परमोच्च शिखर गाठलेलं असतानाच लकी अलीनं अचानक कलाजगतापासून दुरावा पत्करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या या निर्णयानं अनेकांनाच धक्का बसला. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तमाशा' या चित्रपटानंतर त्यानं बॉलिवूडमधून हळुवारपणे काढता पाय घेतला. झगमगणाऱ्या विश्वातील गर्दीपासून तो अलिप्त राहू लागला. एका मुलाखतीदरम्यान अखेर त्यानं या निर्णयामागचं खरं कारण समोर आणलं. 


2017 मध्ये Pollywood Box Office ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं मनातील अनेक गोष्टी बोलूनच दाखवल्या. कलाविश्वाचा चेहरामोहरा बदलत असतानाच इथं नव्या धाटणीच्या चित्रपटांसमवेत कुठंतरी प्रेरणेचा स्त्रोत कमी होत समाजच नकारात्मक होत असल्याचं आपल्याला जाणवत असल्याचं त्यांनी म्हटलं. 


लकी अलीच्या मते हल्ली काही चित्रपटांमध्ये हिंसा आणि लालसेला प्राधान्य दिलं जात असून, आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी ही बाब पूर्णपणे विरुद्ध आहे. 'इथं खूप अपमान पचवावा लागतो, उद्दामपणा सहन करावा लागतो. बॉलिवूड बदलतंय. हल्ली जे चित्रपट साकारले जात आहेत त्यांमध्ये प्रेरणेचा अभाव आहे आणि मला असं वाटतंय की या चित्रपटांमध्ये शिकण्यासारखं फार काही नाहीय', असं लकी म्हणाला. 


हेसुद्धा वाचा : यंदा NOTA जिंकणार निवडणूक? वैतागलेल्या मुंबईकरांनी दिला इशारा, राजकारण्यांची चिंता वाढली 


अपमानाचा मानसिकतेवर होणारा परिणाम... 


मानसोपचारतज्ज्ञांच्या मते अनेकदा अपमान किंवा अनादराच्या भावनेमुळं आपली समाजात असणारी प्रतिमा शून्य असल्याची भावना मनात घर करते आणि यामुळं मानसिक खच्चीकरण होतं. अशा वेळी स्वत:ला महत्त्वं देत त्या दृष्टीनं स्वत:वरच काम करणं हा एकमेव पर्याय त्या व्यक्तीला आधार देत असतो.